Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १९ मे, २०२४

*सर्व धर्म समभाव आणि मानवता हे भारताचे भूषण आहेत त्याला तडा जाता कामा नये* *शिवरायांचा आदर्श जोपासणे व अंगीकारणे काळाची गरज---- इकबाल मुल्ला, सांगली...*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

परराज्यातील वादग्रस्त नेत्यांना, परजिल्ह्यातील जातीयवादी नेत्यांना सांगलीत बोलावून शांत व सुंदर सांगलीचे पावित्र्य भंग करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. "माणुसकी" हाच "सर्वश्रेष्ठ धर्म" असताना,छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज आम्हा सर्वांचे "आदर्श" असताना केवळ "राजकीय पोळी" भाजली जावी म्हणून सांगलीत वातावरण "कलुषित" करणे दुर्दैवी आणि चिंताजनक आहे . येणाऱ्या पाहुण्यांना "पोलीस प्रशासनाने" चिथावणीखोर भाषण करण्यापासून रोखावे व कायदा सुव्यवस्था "अबाधित" राखण्यासाठी हे अत्यावश्यकच आहे. 



वास्तविक इस्लामी देशाप्रमाणे भारतात देखील "कडक कायदे" करणे गरजेचे आहे . ज्याप्रमाणे इस्लामी देशात "चोरी करणाऱ्यांचे हात तोडतात, बलात्कार कडणाऱ्यांना फाशी दिली जाते ,त्याप्रमाणे भारतात देखील तथाकथित "लव्हजेहाद" (झुंडशाहीने केलेले चुकीचे नामकरण ) करणार्यांना हिंदू /मुस्लिम किंवा कोणत्याही धर्माचा असो, त्याला फाशीच द्यायला हवी . तसेच "बलात्कार" करणार्यांना "फाशी" द्यायला हवी. लव्ह जेहाद साठी आपण एखादे आंदोलन उभारतो तेंव्हा मणिपूर दंगल ही आपणास लक्षात असायलाच हवी. कारण भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचा "आदर -सन्मान" केला जातो परंतु "मणिपूर" मध्ये महिलांची नग्न धिंड काढण्यात आली,माणुसकीची इभ्रत लुटण्यात आली,संपूर्ण जगामध्ये माझ्या भारताची "मान" खाली गेली,तेंव्हा यावरदेखील एखादे "निषेध" आंदोलन घ्यायला हवे की नको ??? 



कर्नाटक मध्ये भाजपचे सहयोगी असणाऱ्या आणि खासदारकी चे उमेदवार असणाऱ्या प्रज्वल रेवण्णा याने 3000 महिलांचे लैंगिक शोषण केले ,कित्येंकांवर बलात्कार केले , 65 वर्षाच्या वृद्ध महिलेवर देखील जबरदस्ती केली . आंदोलन करायचे असेल तर या प्रज्वल रेवण्णाच्या विरोधात देखील आंदोलन झाले पाहिजे.याचा निषेध व्हायला हवा .

मोदींच्या कार्यकाळात आणि महाराष्ट्रातं 18 नवीन उद्योगधंदे गुजरात मध्ये पळवण्यात आले, महाराष्ट्रातील "रोजगार" हिसकावण्यात आला, "गरीबाच्या" पोटावर "लाथ मारण्यात आली ,त्यांचा संसाराचा गाडा मोडण्यात आला , कित्येक पिढ्यांची "रोजगाराची" संधी लुटण्यात आली ,या प्रकरणाचे कोणाला कोणाला "दुःख" होत नाही का ??? यासाठी "निषेध" किंवा आंदोलन कधी झाले आहे का ???

माझ्या शिवरायांनी "स्वराज्यासाठी" सुरत लुटली होती म्हणून महाराष्ट्रातील 18 उद्योगधंदे "पळवून" ,ते "गुजरात" मध्ये स्थलांतरित करून हा बदला "घेतला जात आहे का ??? माझ्या "मराठा समाजावर" आणि "माझ्या महाराष्ट्रावर"हा गुजरात चा सूड उगविण्यात येत आहे का ?? महाराष्ट्राच्या होणाऱ्या या अधोगतीला आणि या गंभीर विषयांवर कट्टर मराठा समाजातीतील "नेते" "शांत" का आहेत ??? आज हजारो लोकांचा रोजगार संपुष्ठात आला ,याचा राग कोणत्या राजकीय कार्यकर्त्याला येत नाही का ?? सांगली "प्रदूषित" करणाऱ्या या नेत्यांना "करोडो" रुपयांचे "प्रकल्प" गेल्याचे दुःख होत नाही का ??? याचा "निषेध" करावासा वाटतं नाही का ??? याबद्दल सरकारला "जाब" विचारावा असे वाटतं नाही का ??? मराठा - हिंदू बांधवाची "भरभराट" रोखण्यास "कारणीभूत" ठरणाऱ्या राजकीय पक्षाविरुद्ध" आंदोलन छेडण्यास आजचे हे मराठा नेते का "कचरत" आहेत ?? भाषा विकासाची हवी ,अजेंडा प्रगतीचा हवा, जातीयवाद आणि लोकांची "दिशाभूल" करून पोट भरत नसते व हेच "वास्तव" आहे .

 विरोध करायचा तर त्याच्या प्रचाराला आलेल्या आदरणीय पंतप्रधान मोदीजींचा देखील निषेध करायला हवा होता .

 "इलेक्ट्रॉल बॉण्ड्स "च्या माध्यमातून भाजपाला 6000 कोटी मिळतात .आनंद आहे परंतु या भारतात शेती पिकवून रामराज्य आणणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा योग्य भाव मिळत नाही , वीज ,बीबियाणे ,खत यावर भरमसाठ "करांचे" ओझे लादून त्या शेतकऱ्याची "मुस्कटदाबी" होत असेल आणि 6000 रुपयावर त्याची "बोळवण" होत असेल तर या सरकार विरुद्ध देखील आंदोलन व्हायला पाहिजे की नाही ??? या सरकारचा निषेध व्हायला हवा की नाही ???

भाजपा नेते " संविधान " बदलण्याची भाषा करतात जर हे खरे असेल तर डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मिती केलेल्या संविधानात बदल करण्याच्या भूमिकेशी आपण "सहमत" आहात का ??? याचेही "उत्तर" भारतीय जनता मागत आहे.

महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षात भाजपा सरकारने एक तरी "उद्योगधंदा/प्रोजेक्ट" आणला आहे का ?? त्यामाध्यमातून किमान 1000 लोकांना नोकरीं मिळाली आहे का ??? उत्तर आहे का ??? 

कोरोना काळातील " कोव्हीशील्ड वॅक्सीन" मनुष्याच्या "हृदयास" घातक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.याच कंपनीने 50 कोटी रुपयाची " देणगी " भारत सरकार ला दिल्याचे बोलले जाते .असे असेल तर 50 कोटी रुपयांसाठी भारतातील लाखो लोकांच्या जीवाशी खेळण्याचे " पाप " कोण केले ??? यांना जाब कोण विचारणार ???

"गोहत्या"चा "विरोध" झालाच पहिजे तथापि भारतातील मांस विक्री करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्या कोणाच्या आहेत ?? त्या मुस्लिमांच्या नाहीत, हे हे लक्षात असू द्या. या समूहाकडून भल्यामोठ्या देणग्या कोणाला मिळाल्या ?? याचा शोध लावून या समूहाविरुद्ध आपण आंदोलन छेडले होते का ???

साप - साप म्हणून भुई (जमीन ) बडवण्यात काहीच अर्थ नसतो. जनतेला खायला अन्न पाहिजे, पक्ष/राजकारण नंतर ..हे ही लक्षात असू द्या . 

आज प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर "1.5 लाख" म्हणजेच "दीड लाख" रुपयाचे "कर्ज" आहे .कारण आत्तापर्यंत भारतात "14 पंतप्रधान" होऊन गेले .त्यांच्या कार्यकाळात जागतिक कर्ज 55 लाख कोटी होते . परंतु मोदी राजवटीमध्ये हे कर्ज तब्बल 205 लाख कोटी झाले आहे. ही मोदी यांची "कर्तबगारी" असेल तर मोदी यांचा निषेध करण्यासाठीही "मोर्चा" का काढला नाही ???

सर्वधर्मसमभाव आणि "मानवता" ही भारताची भूषण आहेत. याला "तडा" जाता कामा नये. माझ्या शिवरायांचे आदर्श "विचार" जोपासण्याची आणि अंगीकारणाची आज खरी गरज आहे .

धन्यवाद !



आ .*इकबाल बाबासाहेब मुल्ला*

(*पत्रकार*)

संपादक - सांगली वेध ,

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा