*श्रीपूर---बी.टी.शिवशरण
माळशिरस तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन माळशिरस तालुक्यात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे मात्र तालुक्यातील लाकूड वखार व्यापारी हे दरमहा सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दरमहा हप्ते व मोठा अर्थपूर्ण व्यवहार करत असल्याने माळशिरस तालुक्यात होत असलेल्या बेसुमार वृक्षतोड या घटनेकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे एकीकडे दुष्काळाच्या झळा बसत आहेत पर्जन्यमान कमी होत चालले आहे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण मोहिम शासन मोठ्या प्रमाणावर राबवताना दिसत आहे तर आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी लाकूड वखार मंडळाला त्यांचा लाकडांचा धंदा जोरात चालावा यासाठी जळाऊ लाकडांच्या नावाखाली तालुक्यातील अनेक भागातील गावांत जिवंत झाडे तोडून ती विकण्याचा व्यवसाय सुरू आहे अकलूजला लाकूड खरेदी विक्री धंद्याच्या नावाखाली दररोज हजारो टन जिवंत झाडांची खरेदी विक्री हा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे माळशिरस तालुक्याला भकास करणारे सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पर्यावरण प्रेमी व सामाजिक चळवळीत काम करणारे कार्यकर्त्यांनी सामाजिक वनीकरण मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच वृक्षसंवर्धन विभाग वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे त्या संदर्भात माळशिरस तालुक्यातील नागरिकांच्या सह्यांची मोहिम हाती घेऊन या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केली जाणार आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा