Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २७ मे, २०२४

*"फोफावणाऱ्या 'पब संस्कृतीला' तत्काळ आळा घालणे- काळाची गरज --इकबाल मुल्ला (सांगली)*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

पबसंस्कृती चे आगमन धोकादायक!

मुंबई - पुण्यापाठोपाठ सांगली जिल्ह्यामध्ये देखील पबसंस्कृती चे आगमन होताना दिसत आहे. सांगलीतील सांगली - मिरज रोडवरील काही हॉटेल्सच्या टेरेसवर पार्टीच्या नावाखाली ,मोठमोठी डॉल्बी लावून जो "धिंगाणा" सुरु असतो ,तो पोलिसांनी एकदा आवर्जून पाहावा. रात्री 12 नंतर 30 डेंसिबल्स अथवा मोठ्या आवाजात "सार्वजनिक" ठिकाणी डॉल्बी लावण्यास सरकारची परवानगी आहे का ???

 सांगली मिरज रोडवरील विजयनगर श्रीमंत तरुण - तरुणींचे आवडते ठिकाण बनले आहे. अनेक चित्रपटगृहे येथे आहेत. विजयनगर परिसरातील हॉटेल्स च्या टेरेसवर पोलिसांनी जाणीवपूर्वक सदिच्छा भेट द्यावी. 



वास्तविक सुप्रसिद्ध असणाऱ्या सांगलीतील "हॉटेल्सच्या" आत वादग्रस्त व "चुकीचे प्रकार" घडतं नाहीत. अनेक नामांकित हॉटेल्सनी आपली विश्वासार्हता अबाधित ठेवत सांगली मध्ये आपला "नावलौकिक" जपला आहे. तथापि काही हॉटेलचे टेरेस हे फक्त "पार्टी" करण्यासाठीच वापरले जातात. टेरेसवर पार्टीच्या नावाखाली अंमली पदार्थाचे सेवन केले जाते का ??? याची खातरजमाही पोलिसांनी आवर्जून करावी.

सांगलीपासून कोल्हापूर पर्यंतच्या काही हॉटेलमध्ये श्रीमंत लोकांची "मांदियाळी" जमलेली असते. हॉटेल बाहेर चारचाकी गाड्यांची रांग लागलेली असते. धामणीजवळील काही तारांकित हॉटेलमध्ये 2 व्यक्तींचे बिल 4 - 5 हजार रुपये कसे काय होते ??? याचे गुपित अजूनही उलगडलेले नाही . 



शासनाच्या नियमानुसार हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या गेटवर आणि बाहेर जाणाऱ्या गेटवर "प्रसाधनगृह" सोडून सर्वत्र सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. जिल्ह्यतील हॉटेलमध्ये सीसीटीव्ही आहेत का ??? हॉटेलमध्ये दोन डीव्हीआर मशीन लावणे सक्तीचे आहे ..जेणेकरून पोलीस तपासासाठी एक "मशीन" घेऊन गेले तर दुसरे चित्रीकरण करत राहील. कोणत्या हॉटेलमध्ये 2-2 डीव्हीआर मशीन आहेत का ??? या कायद्याची अमलबजावणी सर्व हॉटेल मध्ये होते का ???

4000 कोटी पेक्षा जास्त अमलीपदार्थ पुण्या - मुंबई मध्ये ,सांगलीमध्ये सापडतात परंतु स्थानिक पोलिसांना याची गंधवार्ता देखील कशी लागत नाही ??? कारण पब मध्ये युवक /युवती आणि पैसे उधळणाऱ्या धनाढ्य लोकांच्या हातात हे अंमली पदार्थ कसे येतात ?? पार्टीमध्ये सेवन करणाऱ्या कोल्ड्रिंक मध्ये एवढी झिंग असते का ???

सांगलीमधील उच्चभ्रू हॉटेलमध्ये,रेस्टो आणि टेरेसवर रात्री 12 नंतर देखील डान्स सुरु असतात. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष का ??? साधी चायनीज गाडी 11 नंतर सुरु असेल तर "दम" भरणाऱ्या पोलिसांची या टेरेस पार्टी वर इतकी" मेहेरनजर " का ???

नुकताच पुण्यामध्ये एका धनाढ्य अल्पवयीन मुलाने दोन निरपराध इंजिनियर मुलाला चिरडले आहे. पबसंस्कृती आणखी किती "बळी" घेणार हा यक्षप्रश्न आहे.

धामणी रोड वरील हॉटेलबाबत पोलिसांची डोळेझाक !

कॅफेच्या विळख्याने उग्र रूप धारण करून "कोवळ्या कळ्या" कुस्करणाऱ्या कॅफेचालक /मॅनेजर यांचा पर्दाफाश करणारे "शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान "चे संस्थापक ,माझे मित्र श्री. नितीन चौगुले यांचे समस्त पालक / युवती यांच्यातर्फे सर्वप्रथम "आभार" व्यक्त करतो. 

एक संवेदनशील विषयाला हात घालून, मुली /तरुणी यांना न्याय देण्यासाठी त्यांनी केलेले धाडस आणि "पाठपुरावा" अभिनंदनीय आहे. 

बायपास - धामणी रोड जवळील हॉटेल मध्ये बारबाला नृत्य सादर करतात अशी बातमी एका वृत्तपत्रात आली होती. त्यानंतर त्या बातमीचे आणि त्या डान्सबार सदृश्य "हॉटेलचे" काय झाले ??? पोलिसांनी गांधारीची भूमिका का घेतली आहे ??? 

स्वर्गीय गृहमंत्री आर .आर .पाटील यांनी डान्सबार आणि "अवैध" अंमली पदार्थविरोधात धडक मोहिम उघडली होती. परंतु दुर्दैवाने आज कुठलाही अधिकारी /मंत्री या गंभीर विषयाकडे गांभीर्याने पाहत नाही. 

कॅफे पाठोपाठ आता पबसंस्कृती फोफावत आहे. यावरदेखील तात्काळ "नियंत्रण" असायला हवे. कारण ही काळाची गरज आहे .

.*इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार*)

संपादक - सांगली वेध,

संपादक - वेध मीडिया न्यूज, सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा