*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
आज दिनांक, २३ मे २०२४ रोजी शिवसेना नेते तथा संभाजीनगर खासदार चंद्रकांत खैरे यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन, व कुलाचार कुलधर्म पूजा करून आई तुळजाभवानी मातेला साकडे घालण्यात आले,महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील सर्वच उमेदवार निवडून येऊ दे असे आई तुळजाभवानी मातेला साकडे घालण्यात आले, व महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे विजयी उमेदवाराला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतआई तुळजाभवानीच्या दरबारात घेऊन येऊन खना नारळाने ओटी भरू आई तुळजाभवानीच्या दरबारात जागरण गोंधळ घालू असे साकडे घालण्यात आले,यावेळी मा, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाम पवार, शिवसेना उपतालुकाप्रमुख सुनील जाधव, शहरप्रमुख सुधीर कदम, नाना बोरडे,संजय हाके,शिवरत्न पवार,यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा