*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
सध्याच्या युगात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रापंचिक सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रात काम करत असताना महिलांच्या प्रगतीत प्रवास हाच सर्वात मोठा अडथळा होता हा अडथळा दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी एसटी प्रवासात मोठ्या प्रमाणावर सवलत देऊन महिलांना प्रवासासाठी आणि समाजकार्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदतच केले आहे पूर्वीच्या काळी महिलांना घराच्या बाहेर पडायचे असेल तर घरातील पुरुषांना किंवा पतीला बाहेर बरोबर घेतल्याशिवाय प्रवास करता येत नव्हता एसटीमध्ये कुठल्याही सुविधा नव्हत्या परंतु आता महाराष्ट्र शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये महिलांची हीच समस्या ओळखून महिलांना 50 टक्के तिकिटावर प्रवास ज्येष्ठ नागरिक महिलांना मोफत प्रवास यासारख्या सुविधा देऊन महिलांना सामाजिक प्रापंचिक राजकीय कार्यासाठी सहयोग दिला आहे त्याचा जास्तीत जास्त लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहन मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष मीनाक्षी जगदाळे अंधारे यांनी केले आहे.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या राज्य परिवहन मंडळात कार्यरत असणाऱ्या सौ विद्या साळुंखे यांची कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी विद्या माने साळुंखे यांनी एसटी महामंडळाच्या माध्यमातून महिलांना देण्यात येणाऱ्या सुविधा महिलांचे हक्क प्रवासात एसटी महामंडळाकडून महिलांना मिळणाऱ्या वेगवेगळे लाभ याविषयी मोठ्या प्रमाणावर माहिती दिली यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष मीनाक्षी जगदाळे आमदार यांनी आपल्या परिसरातील जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व महिलांना प्रवास करत असताना प्रवास करत असताना महामंडळाकडून महिलांसाठी कोणकोणत्या सुविधा आहेत याची माहिती व्हावी म्हणून सदर बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी विद्यमाने साळुंखे यांचा जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यांचा सत्कार जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष मीनाक्षी जगदाळे यांनी केला यावेळी स्वाती देवकर जयश्री देवकर सुवर्णा शेंडगे अनिता खटके शारदा चव्हाण सौ. बालिका गोरे सौ. अर्चना सूर्यवंशी गौरी सूर्यवंशी , शितल जाधव, रूपाली जगदाळे, संध्या सावंत , मीनाक्षी जगदाळे, अश्विनी चव्हाण , साधना जाधव , सुरेखा केदारी , सुप्रिया जगताप , हसीना बशीर , श्रद्धा मोरे ,इत्यादी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा