Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १ मे, २०२४

*ओरिएंटल इंग्लिश स्कुलचा उन्हाळी क्रिडा शिबीराचा समारोप..*

 


*कोल्हापूर ---प्रतिनिधी*

*हर्षल --पोतदार*

*टाइम्स 45 न्युज मराठी.

राजारामपुरी कोल्हापूर येथील ओरीएंटल इंग्लिश स्कूल तर्फे उन्हाळी क्रिडा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्याचा समारोप व बक्षीस वितरण ॲड.विजयकुमार ताटे-देशमुख,ॲड.सुधीर चव्हाण, डॉ.राजश्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या राजलक्ष्मी चव्हाण आणि फरहान पठाण यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्रक देवून सन्मान करण्यात आला. 

          या प्रसंगी शिबिरातील खेळाडूंनी फुटबॉल,ज्युदो,कराटे, लाठी काठी,योगासन यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.याप्रसंगी संस्थेचे चेअरमन ॲड.सुधीर चव्हाण यांनी विद्यार्थीचा शैक्षणिक गुणवत्ता बरोबर व्यक्तिमत्त्व विकास होणे गरजेचे आहे त्या करिता या उन्हाळी शिबिराचे आयोजन केले असल्याचे सांगण्यात आले.

           यावेळी ॲड.विजयकुमार ताटे-देशमुख उन्हाळी शिबिरात सहभागी व पारितोषक विजेत्यांचे यांचे अभिंनंदन केले व संस्थेने उन्हाळी शिबिर आयोजन करून एक तंदरुस्त पिढी घडविण्याचे काम करत असल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले.

           या शिबिराला क्रिकेट कोच मंगेश शिरोडकर,फूटबॉल कोच सौरभ भोसले,योगा प्रशिक्षिका शीला खोत,लाठी काठी प्रशिक्षिका राजलक्ष्मी सुर्यवंशी,देवयानी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

          पाहुण्यांचे स्वागत शरद पवार यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार विक्रम रेपे यांनी केले.या कार्यक्रमास खेळाडू, पालक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा