Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २३ जून, २०२४

*ऑनलाइन भिंगरी जुगार, वाढत्या चोऱ्यांचे प्रमाण ,यासह इतर मागण्यासाठी "पीपल्स रिपब्लिकन पार्टी" च्या वतीने 25 जून रोजी हलगीनाद सह बोंबाबोंब आंदोलन*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मंगळवार 25 जून रोजी अकलूजच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी हलगीनादसह बोंबाबोब आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.मागण्यांमध्ये अकलूज पोलीस स्टेशनअंतर्गत ऑनलाइन भिंगरी जुगार खेळण्याचे युवकांना व्यसन लावून त्यांच्याकडील सर्व पैसे लुटून झाल्यानंतर त्यांना हेच भिंगरी चालक जास्त व्याजाने पैसे देऊन आणखी खेळण्यास भाग पाडून त्यांचेकडील सर्व पैसे लुटून युवकांना कर्जबाजारी करीत आहेत व नंतर घेतलेल्या व्याजाच्या पैशासाठी त्या युवकांना दमदाटी मारामारी व धमकी देऊन पैशांची वसुली करीत आहेत यातून बरीच कुटुंबे उध्वस्त झालेली आहेत तर काही गाव सोडून पळून गेलेले आहेत काहींची आजही व्याजाच्या पैशासाठी पिळवणूक सुरू आहे सदरचा ऑनलाइन भिंगरी जुगार काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानेच अकलूज पोलीस स्टेशनअंतर्गत राजरोसपणे चालविला जातो सदरचा ऑनलाइन भिंगरी जुगार चालवण्यासाठी कोण्या एका पोलीस कर्मचाऱ्यानेच स्वतःचा आयडी दिल्याचे समजते आहे या ऑनलाइन भिंगरी जुगारामधून दररोज लाखो रुपयाची उलाढाल होऊन मोठ्या प्रमाणात पैसे लुटले जात आहेत तसेच अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत गाडी चोरांसह दुकान फोडून सामानही चोरून नेण्याचे प्रमाण वाढले आहे पोलीस स्टेशनला तक्रार नोंद करण्यास गेलेल्या नागरिकांना ऑनलाइन व नेटचा प्रॉब्लेम सांगून तीन ते चार तास अडवून ठेवले जाते अकलूज शहर व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बंदी असलेला गुटखा राजरोसपणे विकला जातो राजश्री शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत केलेले बदल रद्द करून योजनेच्या अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच कायम ठेवाव्यात 302 307 सह अनेक कलमे इतिहास जमा करून भारतीय दंड संहिता ऐवजी भारतीय न्याय संहिताची कलमे लागू करण्यास आमचा तीव्र विरोध आहे अकलूज माळेवाडी नगरपरिषद अंतर्गत केलेल्या सर्व प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या विकास कामांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून सखोल चौकशी व लेखापरीक्षण करून सदर ठेकेदाराचा काळ्या यादीमध्ये समावेश करून यातील दोषी अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करून निकृष्ट दर्जाची विकासकामे पुन्हा नव्याने करून द्यावीत कोविड 19 च्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने कंत्राटी स्वरूपात विविध पदांची भरती प्रक्रिया केली होती कंत्राटी स्वरूपात भरती केलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची परवा न करता रुग्णसेवेसाठी योगदान दिले होते अशा सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू करून त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेऊन त्यांना न्याय द्यावा अकलूज शहरातील राणे नर्सिंग होम या हॉस्पिटलला नवजात शिशु व बाल रुग्णांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेची त्वरित मान्यता देऊन माढा माळशिरस इंदापूर व सांगोला या चार तालुक्यातील गोरगरीब जनतेची होणारी गैरसोय दूर करून त्यांना होणारा आर्थिक व मानसिक त्रास दूर करावा माळशिरस तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांची अवैधरित्या नियुक्ती करणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर यांच्या सर्व प्रकारच्या कामाचे लेखापरीक्षण करून यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करून नवीन माळशिरस तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी माळशिरस तालुक्यातील खराब झालेले सर्व रस्ते त्वरित दुरुस्त करा यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीतील सर्व प्रमुख पदाधिकारी भीमसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत सदर निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे राज्यपाल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री पोलीस महासंचालक मुख्य सचिव उपविभागीय अधिकारी अकलूज उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज पोलीस निरीक्षक अकलूज यांचेसह सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा