*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
मोटार सायकल घ्यायला माहेरून पैसे का आणत नाही, अर्धा एकर जमीन नावावर का करत नाही, या शारिरीक व मानसिक ञासाच्या कारणावरून सवतगाव ता. माळशिरस जि. सोलापूर येथे विवाहिता ,मुक्ता गोपी चव्हाण, वय 22 वर्ष हिने सासरी सवतगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याने अकलूज पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून याबाबत पोलिसांकडून मिळालेली
हकीकत अशी की , वरील तारखेस वेळी व ठिकानी यातील फिर्यादी वर्षा तानाजी चव्हाण वय 40 वर्ष राहणार कोंबडवाडी अनगर ता. मोहोळ जि. सोलापूर हिची मुलगी "मुक्ता गोपी चव्हाण" ही सासरी सवतगाव येथे नांदत असताना तिला आरोपी - नवरा गोपी विजय चव्हाण, सासु- वैशाली विजय चव्हाण ,सासरे - विजय चव्हाण' यांनी संगणमत करून वेळोवेळी फिर्यादीच्या मुलीस घरगुती कारणावरून तसेच मोटार सायकल घ्यायला पैसे का आणत नाहीस व अर्धा एकर जमीन नावावर का करत नाहीस या कारणावरून तिला सतत मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देऊन जाचहट केल्यामुळे त्यांचे त्रासाला कंटाळून फिर्यादीची मुलगी मुक्ता हिने 22 जुन 2024 रोजी सकाळी 9/30 वा.सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे म्हणून वगैरे मजकूर ची फिर्याद अकलुज पोलिस स्टेशन ला दिली असुन आरोपींच्या विरोधात अकलूज पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 337 / 2024 भारतीय दंड विधान कलम 306, 498(A) 323 ,504,506 ,34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून आरोपीस अद्याप अटक झाली नाही या घटनेचा तपास
तपासीक अंमलदार- WPSI मनीषा महाडिक मो. नं. -8767909812 हे करत आहेत.
पोलीस निरीक्षक
अकलूज पोलीस स्टेशन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा