*संपादक ---हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो ;-9730 867 448
सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संजय माळी यांनी ठेकेदारांकडून टक्केवारी घेत माढा तालुक्यातील रस्त्याची कामे अत्यंत निकृष्ट व बोगस दर्जाची केल्याचा आरोप करत जनशक्ती संघटनेने संस्थापक अतुल खूपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयाच्या पुनम गेटवर डोळ्यावर काळी पट्टी बांधून रक्तदान करून अनोखं आंदोलन करून भ्रष्टाचारी अधिकारी संजय माळी यांची सखोल चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी जनशक्ती संघटनेने या आंदोलनाद्वारे केली. दरम्यान अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या रक्तदान आंदोलनात ९४ कार्यकर्त्यांनी रक्तदान करून निषेध व्यक्त केला.
सोलापूर जिल्हा परिषद पुनम गेटवर आज पहिल्यांदाच असे अनोखे आंदोलन झाल्यामुळे आंदोलनाची चर्चा शहरासह जिल्हाभर गाजली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी ठेकेदारांकडून लाखो रुपयांच्या कामांमध्ये टक्केवारी घेतली आहे. बीड कॅपॅसिटी नसलेल्या ठेकेदारांना शासनाचा आदेश डावलून टक्केवारी घेत कामे दिली. टक्केवारी घेतल्यामुळे माढा तालुक्यात झालेली कामे या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अत्यंत बोगस झाल्याचा आरोप जनशक्ती संघटनेने केला.
या आरोपावर संघटनेने अनेक वेळा वरिष्ठ कार्यालयाकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला. यानुसार जनशक्ती संघटनेने आज रक्तदान आंदोलन केले. शिवाय यावेळी राज्याचे बांधकाम मंत्री संजय चव्हाण व अधीक्षक अभियंता संजय माळी यांना रक्ताचा अभिषेक घातला. खून लो... मगर जान मत लो...! अशा घोषणा देत जिल्हा परिषद कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.
जनशक्ती शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते राणा वाघमारे, गणेश वायभासे, रामराजे डोलारे, किशोर शिंदे, सोमा कातुरे, जयसिंग पाटील, बिभिषण शिरसट, महेश नरसाळे, रवींद्र नरसाळे, शहाजी नरसाळे, राहुल जाधव, शंकर नरसाळे, अक्षय देवडकर, सुशांत खूपसे, अभिमान गायकवाड, शरद सपाटे, गणेश ढोबळे, बापू मोहिते, सागर वावरे, ज्योतीराम ढोबळे, लक्ष्मण मुळे, नागेश मुळे, अभिजीत गवळी, बापू काशीद, अमोल बनसोडे, सुधीर पाटील, संजय कोरे, अभिजीत भोसले, संजय गायकवाड, गोरख चव्हाण, चंद्रकांत पुजारी, आप्पा कोठे, एकनाथ पवार, बाबासाहेब गायकवाड, सार्थक गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, महबूब शेख, मधुकर कांबळे, अभिमान तांबोळी, प्रकाश जावळे, सोमनाथ ओडिया यांच्यासह जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी भिकारी मला, पैशाची भूक...!
- माढा तालुक्यातील झालेल्या उत्कृष्ट कामाबाबत जनशक्ती संघटनेने डोळ्यावर काळी फीत बांधून रक्तदान करत अनोखा आंदोलन केलंच, शिवाय अधीक्षक अभियंता संजय माळी यांना प्रतीकात्मक म्हणून ऑफिस खुर्चीवर एका कार्यकर्त्याला बसवून त्याला अर्धनग्न करत त्याच्या तोंडाला काळे फासून त्याच्या गळ्यामध्ये पैशाच्या नोटांची माळ घालण्यात आली. आणि वरून त्याच्या डोक्यावर पैशांचा पाऊस पाडण्यात आला. शिवाय संजय माळी नावाच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यामध्ये मी संजय माळी सार्वजनिक अधीक्षक अभियंता मी भिकारी आहे मला पैशाची खूप भूक आहे अशी पाटी अडकविण्यात आली.
. अन्यथा शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्य अभियंत्यांना घेराव
- सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी रस्त्याच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे. शिवाय भ्रष्टाचार करून बेहिशीबी मालमत्ता जमवलेली आहे. अशा अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास २० जुना रोजी मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांना माढा तालुक्यातील शेकडो हजारो कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांसह घेराव घालून आंदोलन करणार आहे.
- अतुल खूपसे-पाटील
संस्थापक, जनशक्ती शेतकरी संघटना
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा