Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २९ जून, २०२४

*पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टी माळशिरस तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी वाढदिवसाला हारतुरे व फुले यांना खर्च न करता शुभेच्छा देण्यासाठी वही पेन देण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत पीपल्स रिपब्लिकन पार्टी माळशिरस तालुक्याच्या वतीने अकलूजमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन जिलेबी वाटप करण्यात आले.



यावेळी वही पेन व खाऊ वाटप केल्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देऊन प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे तालुका युवक अध्यक्ष सचिन मोरे तालुका संघटक पांडुरंग चव्हाण तालुका सहसंपर्कप्रमुख रोहिदास तोरणे युवक तालुका सरचिटणीस तुषार केंगार राजाभाऊ जाधव गणेश गुजले यांचेसह शाळेचे शिक्षक झेंडे सर झेंडे मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा