Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २९ जून, २०२४

*श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नियोजित आराखडा संदर्भात हरकती व सुनावणी मागवल्या होत्या त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना "शाम पवार"यांचे लेखी निवेदन*

 


*संपादक --- हुसेन मुलाणी*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

    *मो;--9730 867 448

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान च्या नियोजित आराखडा संदर्भात हरकती व सुनावणी त्या संदर्भात तुळजापूर येथील श्याम अंबादास पवार यांनी धाराशिव चे जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन हरकत घेतली आहे त्या संदर्भात निवेदना द्वारे केलेली हरकत पुढील प्रमाणे


दिनांक 27/06/2024

हरकत अर्ज

स्मरणपत्र-1

प्रति,

 . जिल्हाधिकारी 

 धाराशिव तथा अध्यक्ष,

 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर. 

विषय:- श्री क्षेत्र तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत तुळजाभवानी मंदिर मध्ये होत असलेल्या विकास आराखड्यास हरकत असले बाबत.   

संदर्भ:- हरकतदार यांनी दिनांक 13/10/2023 रोजी श्री तुहजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर मार्फत आपल्याला दिलेला हरकत अर्ज.  

शाम अंबादास पवार रा. क्रांती चौक तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव.   



महोदय,

 वरील विषयास अनुसरुन विनंती अर्ज करतो की, महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या पावन नगरीत आपल्या प्रशासनचा मनमानी हिटलरशाही प्रमाणे कारभार चालु असुन तुळजापूर शहर वाशीयांना व पुजाऱ्यांना हुकुमशाही प्रमाणे वागणुक देत आहेत. तसेच तुळजापूर येथे होणाऱ्या विकास आराखडा संबंधीत अधिकारी आणि लोकप्रतीनिधी यांनी संगणमताने तयार केलेला आहे. तुळजाभवानी मंदिराच्या करोडो रुपयाच्या रकमेतुन आराखडा बनविण्याचे काम चालु आहे. तुळजाभवानी मंदिराची आणि राज्य सरकारच्या पैशाची उधपट्टी थांबवावी तसेच पुर्वीचा दर्शनमंडप आहे प्रशासनाने पुर्वीच्या दर्शन मंडपाचा खर्च केलेला आहे. त्यावेळी खर्च केलेल्या दर्शन मंडपास, नगररचना खात्याची मंजुरी नाही. तुळजाभवानी मंदिराची प्रशासकिय इमारतीची उभारणी करताना आराखडा वेगळा ठेवला आणि बांधकाम प्रत्यक्षात वेगळेच केलेले आहे. आताचा दर्शन मंडप हा पैसे उधळपट्टीसाठी आहे. वास्तवीक वर्षातील 365 दिवसापैकी केवळ 40 दिवस गर्दी असते. अनेक वेळा दर्शन मंडपातील मजले रिकामे असतात. तुळजा भवानी मंदीरात दर्शन मंडपात आणि दर्शनास जातानाही भाविकांचा रक्तदाब तसेच मधुमेह अशा प्रकराच्या रुग्णांना चालताना दर्शन मंडप चढउतार करताना मोठ्रया प्रमाणावर त्रास होतो.



 तुहजापूर शहरातील सामान्य नागरीकांच्या, पुजाऱ्याचा घराचे संपादन न करता विकास आराखडा राबवावा. राज्य सरकार विकास आराखडा राबवत आहे त्यामध्ये काही कामाचे टेंडर आलेले आहेत. तर काहीचे टेंडर होणार आहेत. असे असताना प्रत्यक्षात काय अराखडा आहे हा जिल्हाधिकारी आणि मंदिर समितीचे अध्यक्ष हे जाहिर करीत नाहीत. परंतु लोकप्रतीनिधी व मंदिराचे विश्वस्त हे मात्र त्यांनीच आराखडा तयार केला आहे असे सांगतात. तुळजापूर नगर पालीकेने आतापर्यंत तुळजापूर विकास प्राधिकरणासाठी खर्च केलेल्या रकमेचे स्पेशल ऑडीट करावे व ते जनतेसमोर ठेवावे व ऑडीटमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. 

 तसेच तुळजापूर नगर पालीकेला प्रत्येक वर्षी यात्रा अनुदानातुन मोठी रक्कम शासनामार्फत दिली जाते त्याचा वापर हा केवळ दरवर्षी भ्रष्टाचार करण्यासाठी होत आहे. त्याचे ऑडीट होणे गरजेचे असुन ऑडीमध्ये दोषी आढळणाऱ्यावर व भ्रष्टाचार करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडुन अपहार झालेली रक्कम वसुल करण्यात यावी. तसेच श्रीक्षेत्र तुळजापूर प्राधिकरण विकास अंतर्गत तुळजापूर शहरामध्ये अंडर ग्राऊंड गटारी, अंडर ग्राऊंड विज पुरवठा, अर्धवट रस्ते याची चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी व अर्धवट असलेली कामे पुर्ण करण्यात यावीत. 

 महाराष्ट्राच कुलस्वामीनी आई तुळजाभवानी माता ही राज्यातील प्रमुख साडेतीन शक्तीपीठा पैकी एक प्रमुख शक्तीपीठ आहे. या देवस्थानास असंख्या दिनदुबळे, सर्वसामान्य भावीक वर्ग हजारो वर्षापासुन आपआपला कुलधर्म कुलाचार करण्यासाठी तसेच देवीचे सुलभ प्रमाणे दर्शन घेण्याकरीता मोठया संख्येने ये जा करीत असताता मागील अनेक दिवसापासुन मंदिर पुर्वपार चालत आलेले कुलधर्म, कुलाचार मोढीत काढत आहेत. 



• श्री देवीच्या अंगावरती किंवा चरणावरती भाविकांनी मोठ्या श्रध्देने आणलेल्या साड्या पुर्वी प्रमाणेच वाहील्या जाव्यात.

• काळभैरव व टोळभैरव दरवाजा पुर्वी प्रमाणेच खुला (उघडुन) करुन अपंग व वयोवृध्द भाविकांसाठी उघडण्यात यावा. 

• पुर्वर्वापार प्रमाणे देवीच्या गाभाऱ्यातील दर्शन जे प्रशासनाने बंद केले आहे ते भाविक भक्तांना चालु करण्यात यावे.

• मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी दर्शन लाईन हालवीताना देवी भक्तांना सदैव धक्का बुक्की व अरवाच्च भाषेचा वापर केला जात असतो तरी त्यांच्या धार्मिक भावनांचा आदर केला जावा. 

• भाविकांनी घरुन आलेली किंवा नविन घेतलेल्या मुर्तीची देवभेट पुर्वीप्रमाणे चालु करावी तसेच भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने आणलेली माळ परडी देवीच्या चरणावरती पुर्वीप्रमाणेच लावुन देण्यात यावी. 

• आई तुळजाभवानीच्या मंदिरात पुर्वापार चालत आलेल्या श्री तुळजाभवानी मातेची कुलधर्म, कुलाचार पुर्वरतपणे चालु करणे व रुढी परंपरा बंद करु नयेत.

• भाविकांना व पुजाऱ्याना महाद्वारातुनच मंदिर प्रवेश देण्यात यावा. 

• तुळजापूर शहरामध्ये निजामकाळातही न झालेला अन्याय हा आज रोजी प्रशासनामार्फत तुळजापूर येथील रहीवाशी तसेच पुजारी यांच्यावर होत आहे तो थाबविण्यात यावा.  

• श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान व तुळजापूर शहराचा जो विकास आराखडा तयार करण्यात येत आहे त्यामध्ये स्थानिक नागरीक, पुजारी व सर्व राजकीय पक्ष यांना विश्वासत घेण्यात यावे.  

• श्री तुळजाभवानी मंदिरमध्ये भाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी जो दर्शन मंडप नियोजीत केलेला आहे ते घाटशिळ रोड पार्किंग येथे न करता महाद्वार समोरील विजय वाचनालय, शामल धर्मशाळा व नगर परिषद शॉपींग सेंटर येथे करण्यात यावा.  

• तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात कोणतेही सोन्याचे आवरण करु नये. 

• तुळजाभवानी मंदिरात गर्दी नसलेल्या दिवशी गाभाऱ्यात भाविकांना दर्शन चालु ठेवावे.

• दिपक चौक ते भवानी मंदिर हा मार्ग स्थानिकांसाठी खुला करण्यात यावा. 

• श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान मार्फत चालु करण्यात येणारे हॉस्पीटल हे मंदिर संस्थाने स्वत: चालवावे ते कोणासही चालविण्यास देवु नये जेणेकरुन भविष्या येणाऱ्या रुग्णांची आर्थिक व माणसिक पिळवणुक होणार नाही. 

• माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी श्री क्षेत्र तुळजापूर विकास आराखडा 325 काटी जे दिले व त्यामध्ये जे अर्धवट व बोगस आणि राहीलेली विविध विकास कामे चालु करुन व झालेल्या कामाची चौकशी करुन दोषीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.  

 तुळजापूर शहरामध्ये निजामकाळातही न झालेला अन्याय हा आज रोजी प्रशासनामार्फत तुळजापूर येथील रहिवाशयी तसेच पुजारी यांच्यावर होत आहे. तुळजापूर शहरातील भवानीरोड येथील नागरीक, पुजाऱ्यांचे अनेक घरे हे भवानी रोड ते मंदिर येथे असुन प्रशासनाच्या वतीने भवानी रोड ते मंदिरापर्यंत जाणाऱ्या दोनचाकी, तीन चाकी, व इतर वहानास बंदी घातलेली असुन वाहातुकीच्या सर्व रस्त्यावर हुकुमशाही प्रमाणे पोल बसवुण वाहानाची अडवणुक केलेली आहे. तसेच भवानी रोड ते मंदिर परिसरातील स्थानिक रहिवाशांना अत्यावश्यक (दवाखाना, बांधक, व्यापार साहित्य वाहातुक ) ही चक्क बंद केलेली आहे. त्यामुळे मंदिर मध्ये किंवा परिसरामध्ये एख्खदी अनुचित घटना घडल्यास रस्त्यामध्ये कायम स्वरुपी पोल लावल्याने वाहातुक करण्यास मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. तसेच स्थानिक रहिवाशांना त्यांच्या दोन चाकी वाहान हे घरापर्यंत नेता येत नसल्याने व प्रशासनामार्फत दोन चाकी वाहानासाठी कोणतीही पार्किगची व्यवस्था नसल्याने स्थानिक रहिवाशांना त्यांची दोन चाकी व तीन चाकी वाहाने हे कोठे लावावीत याचा गंभिर प्रश्न निर्माण झालेला आहे. कार्यरत असलेले शासकिय प्रशासन हे श्री क्षेत्र तुळजापूर येथे हिटलरशाही प्रमाणे काम करीत असुन ते स्थानिक नागरीक, व्यापारी, पुजारी यांना विश्वासात न घेता हुकुमशाही पध्दतीने त्यांच्या मनात येईल ते करीत असुन ते त्वरीत बंद करुन आपल्या वतीने तुळजापूर शहरातील नागरीक, पुजारी, व्यापारी यांना योग्यतो न्याय देवुन या मग्रुर प्रशासनावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे 

 श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर संस्थान व तुळजापूर शहराचा जो विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रशासन हे स्थानिक नागरीक, पुजारी यांना विश्वासत न घेता मनमानी व हुकुमशाही पध्दतीने त्यांच्या मर्जी नुसार अन्यायकारक आराखडा तयार करीत आहेत. तरी आपणास विनंती की, तुळजापूर शहरातील स्थानिक नागरीक, पुजारी व व्यापारी व सर्वपक्षीय नेते यांना तुळजापूर विकास आराखडयामध्ये विश्वासात घेवुन सर्व सहमतीने तुळजापूर विकास आराखडा तयार करण्यात यावा. 

 श्री तुळजाभवानी मंदिरमध्ये भाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी घाटशिळ रोड पार्किंग मध्ये जो दर्शन मंडप नियोजीत केलेला आहे तो प्रशासनाने कोणासही विश्वासत न घेता मनमानी कारभार करुन सदर दर्शन मंडप नियोजीत केला आहे. तरी सदर ठिकाणी दर्शन मंडप न करता तो महाद्वार समोरील विजय वाचनालय, शामल धर्मशाळा व नगर परिषद शॉपींग सेंटर येथे करण्यात यावा. 

 वरील हरकती बाबत संदर्भीय हरकत अर्जानुसार हरकत घेवुन 08 महीण्याचा कालावधी पुर्ण झाला आहे. परंतु माझ्या हरकतीवर आज पर्यत कोणतीही कार्यवाही अथवा सुनावनी झालेली नाही. 

 तरी मा. साहेबां विनंती की, वरील बाबींचा विचार करुन आपल्या मार्फतने योग्यतो न्याय द्यावा व तुळजापूर येथे प्रशासनामार्फत चालु असलेली हिटलरवादी हुकुमशाही तात्काळ बंद करण्यात यावी अन्यथा नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्यात येईल व वेळ प्रसंगी मे. न्यायालयात दाद मागावी लागेल याची नोंद घ्यावी व होणाऱ्या परिणामास आपण स्वत: जबाबदार राहाल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे

सोबत- दिनांक दिनांक 13/10/2023 रोजी दिलेल्या संदर्भीय हरकत अर्जाची प्रत. 

        आपले नम्र

  *शाम अंबादास पवार*




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा