Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३० जून, २०२४

संत शिरोमणी नरहरी सोनार पालखी मार्गाचे काम रखडले. सराटी ते मोठा नळ (गणेशवाडी) मार्गाची दुरावस्था, ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

---- संत शिरोमणी नरहरी सोनार पालखी मार्गाचे काम रखडले. सराटी ते मोठा नळ (गणेशवाडी) मार्गावर पाण्याचा निचऱ्यासाठी पाईप न टाकणे, पुलाचे काम न करने, डांबराचे योग्य प्रमाण न वापरणे, साईड पट्टीवर मुरूमा ऐवजी मातीचा वापर, निकृष्ट दर्जाचे काम, एकही साईड गार्ड दगड न बसवता काम पूर्ण दाखवून बिल काढल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यात जाण्याची भिती नागरिकांनी व्यक्त केली आहे. कर्मचारी, अधिकारी व ठेकेदारांची सखोल चौकशी करून कारवाईची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.

     सराटी गणेशवाडी या संत शिरोमणी नरहरी सोनार पालखी मार्गाचे काम अनेक वर्षांच्या मागणीनंतर करण्यात आले आहे. पाच किलोमीटर मार्गाच्या कामाला कोट्यवधी रुपयांचा निधी वापरण्यात आला आहे. त्यापैकी सराटी कडूनचा अडीच किलोमीटरचा कामाचा निधी पाण्यात जाण्याच्या मार्गावर आहे. मार्गाचे काम कोणतीही नियम, अटींचे पालन न करताच घाईगडबडीत करून पुर्ण निधी काढून घेण्यात आला आहे. पाच किलोमीटरचे काम दोन ठेकेदार मार्फत करण्यात आले आहे. त्यामध्ये बावडा नरसिंहपूर मार्ग गणेशवाडी ते मोठा नळापर्यतचे काम काॅक्रीटीकरणासह पुर्ण करण्यात आले आहे. सराटी ते मोठा नळा पर्यंतचे काम एक टप्पा तर बावडा नरसिंहपूर मार्ग गणेशवाडी ते मोठा नळ असा दुसरा टप्पा असे दोन ठेकेदार मार्फत करण्यात आले आहे. यातील सराटी ते मोठा नळापर्यतचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे.

      सराटी गणेशवाडी या पाच किलोमीटर मार्गाचे काम बारा वर्षानंतर करण्यात आले आहे. यापूर्वी हा रस्ता जिल्हा परिषदेकडे होता. त्यामुळे निधीची मर्यादा असल्याने ज्यादाचा निधी टाकता येत नव्हता. पण तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी गणेशवाडी ते मोठा नळ या अर्ध्या मार्गाचे काम केले होते. तेव्हापासून आजता गायत याचे कामच करण्यात आले नव्हते. त्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी व नागरीकांना मोठा वळसा मारून जावे लागत होते. अनेकदा मागणी करूनही एकाही जिल्हा परिषद सदस्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे दहा वर्षे या भागातील नागरिकांना हाल सोसावे लागले आहेत. तसेच पालखीही याच खडतर मार्गाने घेवून जावे लागले आहे.



    आमदार दत्तात्रय भरणे यांनी गणेशवाडी, सराटी ते निरनिमगाव या मार्गासाठी नऊ कोटीचा निधी मंजूर केला होता. त्याचे काम काही ठेकेदाराने मार्च एंडच्या घाई गडबडीत बिल काढून घेण्याच्या चलबिलीत पूर्ण केले. परंतु कामाच्या चार ते पाच महिन्यातच अनेक ठिकाणी रस्ता उघडला असून साईड पट्ट्यांवर मुरमा ऐवजी माती टाकून रोलर न फिरवतात ओबडधोबड पसरवण्यात आला. तसेच सराटी ते मोठा नळ या टप्प्यातील काम अपूर्णच असून बिल मात्र पुर्ण काढण्यात आल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

    सराटी गणेशवाडी पाच किलोमीटर रस्त्यावर पाणी निचरासाठी एकाही ठिकाणी पाईप टाकण्यात आलेला नाही. तसेच पुलाचेही काम करण्यात आले नसल्याने पावसाळ्यात रस्ता वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे सदर कामाची सखोल चौकशी करून कर्मचारी, ठेकेदार व प्रत्यक्ष कामाची पाहणी न करताच बिले काढणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. सदर बाबत ठेकेदार व अधिकारी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

चौकट - प्रतिवर्षी परंपरेप्रमाणे संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज पालखीचा मार्ग आहे. तसेच नरसिंहपूर परिसरातील विद्यार्थी, नागरिक व शेतकऱ्यांना अकलूज, सराटीला जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून सराटी गणेशवाडी मार्गाचा ज्यादा वापर होत आहे. मार्गाच्या कामामुळे वाहतुकीतही मोठी वाढ झाली आहे. परंतु दर्जाहीन कामामुळे मार्गाचे काम फार काळ टिकण्याची शक्यता दुसर बनली आहे. पालखी पर्यंत अपुर्ण पुलांची कामे पुर्ण होणार का?

फोटो - सराटी गणेशवाडी मार्गावरील मराठी लगतचा अपुर्णावस्थेतील पुल दिसत आहे. 

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा