*अकलुज ----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक २१ जून २०२४ रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार महिला सक्षमीकरणासाठी योग या थीमवर 'आंतरराष्ट्रीय योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या खाशाबा जाधव इनडोअर स्टेडियममध्ये करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग शाखा अकलूजचे योग प्रशिक्षक गोरख डांगे यांना आमंत्रित करण्यात आले होते.त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांना शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगासनाचे महत्त्व सांगितले तसेच त्यांनी विविध आसनांची व प्राणायमची प्रात्यक्षिक करून दाखवली.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर,शारीरिक शिक्षक संचालक प्रा.अरविंद वाघमोडे,प्रा.दादासाहेब कोकाटे डॉ.बाळासाहेब भोसले,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.दत्तात्रय मगर,डॉ.सज्जन पवार,प्रा.स्मिता पाटील,राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख प्रा.नंदकुमार गायकवाड,कार्यालयीन प्रबंधक राजेंद्र बामणे,कार्यालयीन अधिक्षक युवराज मालुसरे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, १४० विद्यार्थी व १०० विद्यार्थिनींनी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिमखाना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा