*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
आसिफ कुरणे fb पोस्ट -
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मुस्लिम मते एकगठ्ठा महाविकास आघाडीकडे गेली म्हणून महायुतीला जागा मिळाल्या नाही म्हणून जो ढोल बडवत आहेत. त्यात त्यांना खरी गोष्ट दाबायची आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीत दलित मुस्लिम यांच्यापेक्षा एकगठ्ठा मराठा समाजाची मते महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभी राहिली आहेत. मुस्लिम समाजावर खापर फोडून मनोज जरांगे पाटील फैक्टर कमी दाखवण्याचा हा सगळा खेळ सुरू आहे. आणि माध्यमे देखील असेच नरेटीव्ह सेट करत आहेत. कारण आगामी विधानसभेत मुस्लिम द्वेषामुळे आपल्यापासून फुटलेली हिंदू खासकरून मराठा मते परत आपल्याकडे वळावीत याचसाठी हे सगळे सुरू आहे.
मुस्लिम समाजापेक्षा मराठा समाजाने झाडून महाविकास आघाडीला मतदान केले हे कसे ते पुढील आकडेवारी वरून समजून घेवूया. (मुस्लिम व दलित हे पारंपारिकरित्या काँग्रेस व धर्मनिरपेक्ष पक्षांना मतदान करतात हे तरी मान्य, महाराष्ट्रात 90 लाख मुस्लिम मते तर 1 कोटीपेक्षा थोडी जास्त मते दलित समाजाची आहेत. यात सगळे एससीच्या जातीजमाती. गेल्या वेळी यातील 43 लाखांपेक्षा जास्त मते वंचित आघाडीला होती )
2019 च्या लोकसभा निवडणुकीत 25 जागा लढवून 1 कोटी 49 लाख 12139 मते मिळाली होती तर शिवसेनेला 23 जागा लढवत 1 कोटी 25 लाख 89,064 मते मिळाली होती. म्हणजे महायुतीला 2 कोटी 75 लाख 01203 एवढी मते मिळाली होती.
तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसला 25 जागा लढवत 87 लाख 92,237 मते तर राष्ट्रवादी काँग्रेसला 19 जागा लढवत 83 लाख 87 363 एवढी मते. त्याचप्रमाणे चार जागा मित्र पक्षांना होत्या त्याची 12 लाख मते. सर्व मिळून 1 कोटी 82 लाख 79600 एवढी मते होता. म्हणजे महायुतीच्या तुलनेत तब्बल 1 कोटी मते कमी.
आता 2024ची आकडेवारी बघा, 28 जागा लढवत भाजपला मिळालेली मते 1 कोटी 49 लाख 13914, शिवसेना ( शिंदे ) 15 जागा लढवत 73 लाख 77 674 मते राष्ट्रवादी काँग्रेस 4 जागा लढवत 20 लाख 53,757 मते व रासप 5 लाख अशी एकूण मते 2 कोटी 48 लाख 45, 345. दुसरीकडे काँग्रेस 15 जागा लढवत 96 लाख 41856, राष्ट्रवादी शरद पवार 10 जागा लढवत 58 लाख 51, 166, शिवसेना उद्धव ठाकरे 23 जागा लढवत 95 लाख 22, 797 अशी एकूण मते 2 कोटी 50 लाख 15,819 मते.
2019 च्या तुलनेत जवळपास 80 लाखांपेक्षा जास्त मते महाविकास आघाडीकडे वाढली आहेत. आता या वाढलेल्या मतामध्ये गेल्यावेळी वंचित ला गेलेल्या मतापैकी 20 लाख मते परत आली तरी उर्वरित 60 लाख मते ही कोणाची. या 60 लाख मतांमध्ये बहुतांश मते ही मराठा समाजाची आहेत. आणि सत्ताधाऱ्यांना हीच भीती आहे की मराठा समाजाने विधानसभेला असेच मतदान केले तर अनेकांच्या डिपॉझिट जप्त होतील. म्हणून मुस्लिम समाजावर खापर फोडा, युवकांच्या मनात तेढ निर्माण करा व ही मते परत आपल्याकडे वळवा. हेच सुरू आहे.
मराठा + मुस्लिम + दलित +कुणबी (ओबीसी ) या गणितासमोर कोणतेच गणित टिकत नाही. पण हिंदू मुस्लिम केल्याने हे गणित बिघडते हे माहीत असल्यामुळे 𝚟𝚘𝚝𝚎 𝚓𝚒𝚑𝚊𝚍 चा ढोल वाजवला जात आहे.
महाराष्ट्र मध्ये मुस्लिम मतदार निर्णायक असलेले 9 लोकसभा मतदार आहेत. यातील 0 भाजप,3 शिवसेना, 2 उद्धव ठाकरे, 3 काँग्रेस, 1 शरद पवार पक्षाने जिंकला आहे. उर्वरित 39 मतदारसंघात काय झालंय हे सगळ्यांना माहीत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा दिसतोय तेवढा हलका नाही. याकडे सरकारने लक्ष दिले नाही तर विधानसभेला यापेक्षा जास्त धक्कादायक निकाल लागतील.
मुस्लिम समाजाच्या नावाने खडेफोडून काही होणार नाही. विधानसभेत 24 मतदार संघ मुस्लिम बहुल व 25 निर्णायक स्थितीत असलेले आहेत. उर्वरित 230 मतदारसंघात मराठा, ओबीसी यांचीच मक्तेदारी आहे. तेथे काय बोलणार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा