Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १४ जून, २०२४

*आधी इंग्रजी बोला.. मग व्याकरण शिका... प्रा. अरुण खंडागळे*

 


*अकलुज ---प्रतिनिधी*

 *केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी

व्याकरणाची भिती हा इंग्रजी शिकण्यातील खुप मोठा अडसर आहे.म्हणून आम्ही एक अभिनव प्रयोग केला आहे.आधी इंग्रजी बोलायला शिका.मग हळुहळु व्याकरण शिका.चॅलेंज स्पोकन इंग्लिश कोर्स हे महाराष्ट्रातील एक क्रांतीकारी पुस्तक ठरणार असल्याचे मत या पुस्तकाचे लेखक ॲड.प्रा.अरूण खंडागळे यांनी व्यक्त केले.

        या प्रसंगी संजय खुडे,विष्णु खुडे,सुखदेव साठे उपस्थित होते.पुस्तकाविषयी माहिती देताना प्रा.खंडागळे म्हणाले की,बाळ जेव्हा आईच्या सानिध्यात राहुन भाषा शिकायला लागते तेव्हा ते प्रथम बोलायला शिकते.मग आई हळु हळु त्याच्या बोलण्यातील चुका दुरुस्त करत त्याची भाषा शुध्द करते.आई त्याला अगोदर व्याकरण शिकवत नाही.हिच कल्पना आम्ही वापरली आहे.अगोदरच व्याकरण शिकायला घेतले की इंग्रजी शिकण्यातील मजा निघुन जाते. व शिकणारा व्यक्ती इंग्रजीच्या नादी लागत नाही.इंग्रजी शिकताना व्याकरणाचा अतिरेकी अट्टाहास काय कामाचा.

           आमच्या पुस्तकामध्ये आम्ही ४५ दिवसांचे ४५ टॉपिक ठेवले आहेत.सहज आणी सुलभरित्या इंग्रजीची वाक्ये बोलता येतील व निर्माणही करता येतील.वाचकांचे आयुष्य बदलून टाकणारे हे ७८४ पानांचे पुस्तक आहे.याची मुळ किंमत ४५० असली तरी सध्या स्वागत मुल्य म्हणून आम्ही ३०० रूपयांना बाजारामध्ये हे पुस्तक उपलब्ध करत आहोत.

           या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दि.१६ जुन २०२४ रोजी सकाळी ११ वाजता स्मृतीभवन, शंकरनगर अकलूज येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते- पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.यावेळी जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर,प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे,प्रा.डॉ.धनंजय साठे,प्रा.डॉ.शरद कर्णे,प्रा.रविंद्र कोकरे,ॲड.एन.पी.शिंदे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा