Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १९ जुलै, २०२५

*महाराष्ट्रातील 20 "आय ए एस" अधिकाऱ्यांच्या बदल्या महत्त्वाच्या पदावर नवीन नियुक्त्या*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

IAS Officer Transfer : राज्य सरकारने गुरुवारी २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये अनेक वरिष्ठ आणि नव्याने आयएएस सेवेत समाविष्ट झालेल्या अधिकाऱ्यांचा समावेश असून, पर्यटन, समाज कल्याण, पालिका प्रशासन, भूअभिलेख, आदिवासी विकास अशा विविध विभागांमध्ये नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यां बदल्यांना विशेष महत्व दिले जात आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम.एम. सूर्यवंशी यांची वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे. तर पुणे महापालिकेच्या पीएमपीएमएलच्या अध्यक्षा श्रीमती दीपा मुधोल-मुंडे यांची नियुक्ती समाज कल्याण आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

1) एम.एम. सूर्यवंशी (IAS:SCS:2010)

पूर्वीचे पद: व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई

नवीन पद: आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, वसई

2) दीपा मुधोल-मुंडे (IAS:RR:2011)

पूर्वीचे पद: अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

नवीन पद: आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे

3) नीलेश गटणे (IAS:SCS:2012)

पूर्वीचे पद: सीईओ, स्लम पुनर्वसन प्राधिकरण, पुणे

नवीन पद: व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई

4) ज्ञानेश्वर खिलारी (IAS:SCS:2013)

पूर्वीचे पद: संचालक, ओबीसी/बहुजन कल्याण, पुणे

नवीन पद: अतिरिक्त सत्तेवसुली आयुक्त व अतिरिक्त संचालक, भूअभिलेख, पुणे

5) अनिलकुमार पवार (IAS:SCS:2014)

पूर्वीचे पद: आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका

नवीन पद: सीईओ, एमएमआरएसआरए, ठाणे

6) सतीशकुमार खडके (IAS:SCS:2014)

पूर्वीचे पद: संचालक (आपत्ती व्यवस्थापन), महसूल व वन विभाग, मंत्रालय

नवीन पद: सीईओ, स्लम पुनर्वसन प्राधिकरण, पुणे

7) भालचंद्र चव्हाण (IAS:Non-SCS:2019)

पूर्वीचे पद: आयुक्त, ग्राउंड सर्व्हे डेव्हलपमेंट एजन्सी, पुणे

नवीन पद: संचालक (आपत्ती व्यवस्थापन), महसूल व वन विभाग, मंत्रालय

8) सिद्धार्थ शुक्ला (IAS:RR:2023)

मागील आदेश दि. 2 जुलै 2025 मध्ये बदल

नवीन पद: प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, धारणी व सहायक जिल्हाधिकारी, धारणी उपविभाग, अमरावती

9) विजयसिंह शंकरराव देशमुख (अति.जिल्हाधिकारी, IAS पदोन्नती)

पूर्वीचे पद: अतिरिक्त आयुक्त-2, संभाजीनगर विभाग

नवीन पद: व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई

10) विजय सहदेवराव भाकरे (अति.जिल्हाधिकारी, IAS पदोन्नती)

पूर्वीचे पद: अध्यक्ष, जात वैधता समिती, भंडारा

नवीन पद: सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर

11) त्रिगुण शं. कुलकर्णी (अति.जिल्हाधिकारी, IAS पदोन्नती)

पूर्वीचे पद: अतिरिक्त महासंचालक, एमईडीए, पुणे

नवीन पद: उपमहासंचालक, यशदा, पुणे

12) गजानन धोंडीराम पाटील (अति.जिल्हाधिकारी, IAS पदोन्नती)

पूर्वीचे व नवीन पद: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे (पद कायम)

13) पंकज संतोष देवरे (अति.जिल्हाधिकारी, IAS पदोन्नती)

पूर्वीचे पद: अध्यक्ष, जात वैधता समिती, लातूर

नवीन पद: अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

14) महेश भास्करराव पाटील (अति.जिल्हाधिकारी, IAS पदोन्नती)

पूर्वीचे पद: अतिरिक्त विभागीय आयुक्त (महसूल), पुणे विभाग

नवीन पद: आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

15) मंजिरी मधुसूदन मनोळकर (अति.जिल्हाधिकारी, IAS पदोन्नती)

पूर्वीचे पद: संयुक्त आयुक्त (पुनर्वसन), नाशिक विभाग

नवीन पद: व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फार्मिंग कॉर्पोरेशन, पुणे

16) आशा अफजल खान पठाण (अति.जिल्हाधिकारी, IAS पदोन्नती)

पूर्वीचे व नवीन पद: संयुक्त सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर (पद कायम)

17) राजलक्ष्मी स. शहा (अति.जिल्हाधिकारी, IAS पदोन्नती)

पूर्वीचे पद: अतिरिक्त विभागीय आयुक्त (सामान्य), कोकण विभाग, मुंबई

नवीन पद: व्यवस्थापकीय संचालक, MAVIM, मुंबई

18) सोनाली निळकंठ मुळे (अति.जिल्हाधिकारी, IAS पदोन्नती)

पूर्वीचे पद: अध्यक्ष, जात वैधता समिती, अमरावती

नवीन पद: संचालक, ओबीसी/बहुजन कल्याण, पुणे

19) गजेन्द्र चिमंत्राव बावणे (अति.जिल्हाधिकारी, IAS पदोन्नती)

पूर्वीचे पद: अध्यक्ष, जात वैधता समिती, बुलढाणा

नवीन पद: आयुक्त, ग्राउंड सर्व्हे डेव्हलपमेंट एजन्सी, पुणे

20) प्रतिभा समाधान इंगळे (अति.जिल्हाधिकारी, IAS पदोन्नती)

पूर्वीचे पद: अध्यक्ष, जात वैधता समिती, सांगली

नवीन पद: आयुक्त, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजीनगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा