Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १४ जून, २०२४

*माळीनगर येथे दाखले वाटपासाठी विशेष शिबिर संपन्न*

 


*उपसंपादक----नुरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्युज मराठी

माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांचेकडील आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली आज शुक्रवार दि.१४ जून रोजी माळीनगर येथील दि मॉडेल विविधांगी प्रशाला येथे शैक्षणिक कामांसाठी लागणाऱ्या दाखले वाटपासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .सध्या सर्वत्र शाळा-महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले,नॉन क्रिमीलेअर,जातीचे दाखले इत्यादीची आवश्यकता असते. सदर दाखले विद्यार्थ्यांना कमी वेळेत व एकाच छताखाली उपलब्ध व्हावेत यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य कल्लाप्पा बिराजदार व उपप्राचार्य रितेश पांढरे यांचे हस्ते विद्यार्थी व पालकांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले.या शिबिरावेळी मंडल अधिकारी संजय फिरमे,तलाठी नेहाल जाधव, लवंगच्या तलाठी भाग्यश्री बरडे,पर्यवेक्षक कल्याण कापरे,जेष्ठ शिक्षक राजीव देवकर,बाळू हंकारे, मंडलातील सर्व तलाठी, कोतवाल व महा-ई-सेवा केंद्र चालक अविनाश चक्रे आदी शिक्षक-शिक्षिका,पालक उपस्थित होते.सदर शिबिरात १३८ दाखल्यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा