*इकबाल बाबासाहेब मुल्ला (पत्रकार)*
*सांगली*
*मो:-8983 587 160
, *सांगली जिल्ह्यातील "इस्लामपूर" या शहराचे आता नामकरण " ईश्वरपूर" !*करणार अशी घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
शहरांची नावे बदलल्याने *महायुतीचे अपयश* "झाकणार" आहे का ?? ज्याप्रमाणे *कोंबडा* न आरवण्याने सूर्य यायचा थांबत नाही अगदी त्याचप्रमाणे उठसुठ महाराष्ट्रातील मुस्लिम सदृश्य शहरांची नावे बदलल्याने महायुतीचा नाकर्तेपणा अपयश झाकले जाणार नाही.
*ईश्वर - अल्लाह तेरे नाम ,सब को संमत्ती दे भगवान !
आज "इस्लामपूर "शहराच्या अथवा राज्यातील अन्य शहरांच्या नामांतराने केवळ अंधभक्तांना समाधान मिळेल. परंतु त्याच अंधभक्तांना आज बाजारात दूध 72 रुपये लिटर असताना 36 रुपयाला मिळणार आहे का ?? गोडेतेल 180 रुपये किलो असताना 100 रुपये दराने मिळणार आहे का ?? घरगुती गॅस आज 870 रुपये असताना तो अंधभक्तांना 500 रुपये दराने मिळणार आहे का ?? वीजबिल युनिट 8 रुपये दराने असताना अंधभक्तांना वीजबिल 5 रुपये दराने मिळणार आहे का ?? "उद्योगधंदे" गुजरात मध्ये गेल्याने बेकारी - "बेरोजगारी" वाढली असताना अंधभक्तांना महाराष्ट्र सरकार सरसकट सरकारी "नोकरी" देत 50,000 पगार देणार आहे का ??? सर्वांची राहू दे ,महायुती - सरकार केवळ अंधभक्तांची "बेरोजगारी" कमी करणार का ??
वरील सर्व मुद्दे महायुती करणार असेल तर महाराष्ट्रातील सर्व शहरांची नावे खुशाल बदलावीत . माझ्या मराठा बांधवांचे हित" "जोपासले" जातं असेल तर त्या हिंदूंचा लहान भाऊ. "मुस्लिम" 100% या मोठ्या भावासोबत असेल याची मी ग्वाही देतो. परंतु महायुती हे सर्व करेल का ???
"विकासकामे" न करण्याचा,महाराष्ट्र "भकास" करण्याचा,महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला नेण्याचा, महाराष्ट्रात 3 महिन्यात 787 आत्महत्या झाल्या त्याचा आणि महत्वाचे म्हणजे अदानीला कवडीमोल दराने मुंबईतील धारावीची जमीन विकण्याचा जो आरोप होतो तो "शहरांची नावे बदलून " "थांबणार" आहे का ???
"नाव बदलल्याने" जर राज्यातली गरीबी कमी होतं नसेल, वाढलेला भ्रष्टाचार कमी होणार नसेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नसेल, महिला अत्याचार कमी होणार नसतील , हुंडाबळी थांबणार नसेल, "बेरोजगारांना" रोजगार मिळणार नसेल, तर "मुस्लिम नाव"असलेल्या शहरांची नावे बदलून महायुती सरकार काय सिद्ध करतेय ???
आज गोरगरीब जनतेच्या हिताचा निर्णय घेण्याऐवजी चुकीचा "पायंडा" पाडला जातं आहे. राजकीय कवचकुंडले पांघरलेल्या सरकारला "जनाची" नव्हे तर मनाची "लाज" वाटली पाहिजे कारण आज शेतकरी "मरत" आहे, खतांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. आणि सरकार "नावे बदलण्याचा" "पराक्रम" करत आहे.खरंच आपले दुर्दैव आहे.
नाव बदलण्याने केवळ अंधभक्तच आनंदी होतो. सर्वसामान्य लोकांना नावाशी काही "देणेघेणे" नसते.,आज जनतेला "विकास" हवा आहे, तरुणांना रोजगार हवा आहे, शहरांची नावे बदलण्याचे "नाटक" करून तुमचे अंधभक्तच टाळ्या वाजवतील.
राज्यात गुन्हेगारीचे थैमान माजले आहे, सांगली जिल्ह्यात वर्षात 50 खून झाले आहेत, भारत गोमांस विक्रीत "दुसऱ्या क्रमांकावार" आला आहे. विशेष म्हणजे त्यात एकही "मुस्लिम विक्रेता" नाही हे विशेष !
औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर केले, त्याचा जनतेला काय फायदा झाला ?? अहमदनगर चे नावं बदलले म्हणून या शहराचा काही "विकास" झाला का ???
जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी, "भरकटण्यासाठी" शहरांची नावे बदलून काही हिंदू बांधवांना खुश करण्याचा केविलवाणा प्रयत्न दुर्दैवाने सरकारकडून होतं आहे,याचे मनस्वी वाईट वाटते. तात्पर्य , "ईश्वर" आणि "अल्लाह" एकच आहेत , एकाच नाण्याच्या दोन बाजू, ज्यांना "सरकार - प्रशासन " नव्हे तर ,जगातील कोणतीच शक्ती वेगळी करू शकत नाही.
धन्यवाद !
. *इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक -सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा