Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २२ जून, २०२४

*छञपती संभाजीनगर येथील जिल्हा बँकेसमोरील उपोषण मध्यस्थी नंतर व लेखी पत्र दिल्यानंतर स्थगित*

 


*नाशिक जिल्हा प्रतिनिधी

--डाॕ.शेरुभाई मोमिन

मौजे नागमठाण येथील गणेश सुभाष तांबे,चेअरमन, अशोक रामराव राशिनकर, व्हा. चेअरमन हे आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा ब़ँक, कार्यालय . छत्रपती संभाजीनगर येथे, बेमुदत आमरण उपोषणास बसले होते.सदरील मागणीकडे लक्ष देऊन बुधवारी त्यांची मा. नगराध्यक्ष डॉ. दिनेशभाऊ परदेशी, व. सर्व सहकारी मित्र मंडळ, यांनी त्वरित समक्ष भेट घेऊन जिल्हा बँक प्रशासना सोबत, सदर चर्चा करून त्यांनी लेखी स्वरूपात केलेल्या मागण्या बाबत खुलासा केला.सदरील मागण्या बाबत लेखी खुलासा दिल्यानंतर बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले, यावेळी सर्व अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..

१. सन २०२०-२५ मधील ३३८ सभासदांचे मंजूर कमाल पत्रकातून थकबाकीदार सभासद वगळता इतर सभासदांने बैंक धोरणानुसार कागदपत्रकाची पूर्तता केल्या नंतर दि.३१ जुलै २०२४ पर्यंत पीक कर्ज वाटप करणेत येईल.


२. नागमठाण प्रा.वि. संस्थे सिएससि सेटंर मंजूर झाले नंतर बैंक मायक्रो एटिएमची सुविध उपलब्ध करुन देईल.


३. नागमठाण गावातील महिला बचत गटाने बैंक कर्ज धोरणानुसार कागदपत्रकाची पूर्तता केलेनंतर वाटप करण्यात येईल.


४. मा.चिफ जनरल मॅनेजर, नाबार्ड, पुणे कार्यालयास शाखा सुरु करण्यासाठी परवानगी मिळणेसाठी दि. ०२.०२.२०२४ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. अद्याप नाबार्ड कार्यालयाकडुन परवानगी मिळालेले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा