Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २२ जून, २०२४

*दहिगाव ता.माळशिरस येथे कृषी सल्ला केंन्द्राचे उदघाटन.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी दुतांच्या कृषी संलग्न केंद्राचे उद्घाटन सोहळा दहिगाव च्या सरपंच सोनम खिलारे यांच्या हस्ते संपन्न झाला आसुन अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष-" संग्रामसिंह मोहिते पाटील "यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य आर. जी. नलावडे प्रा. एस एम एकतपुरे ,प्रा. एम एम चंदनकर, प्रा. एच व्ही कल्याणी, यांच्याही मार्गदर्शनाखाली विकास कुंभार, अक्षय शिंदे, संदेश पाटील, प्रीतम मोरे ,राहुल इंगोले ,सौरभ हेगडे, धर्मराज अनंतकवळस ,योगेश केदार ,या कृषी दुतांनी शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन केले व शेतीतील माती परीक्षण ,सेंद्रिय शेती, ठिबक सिंचन, औषध फवारणी व किडी आळी- रोगाबाबत मार्गदर्शन केले

      याप्रसंगी दहिगाव चे उपसरपंच -रामचंद्र फुले , ॲडा.रणधीर पाटील ,संदीप सावंत व परिसरातील प्रगतशील शेतकरी वर्ग आणि कृषी दूत उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा