*अकलुज ----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
मतदानबद्दल आज समाजामध्ये उदासीनता दिसून येतेय.तेच ते नेते आणि त्याच त्या आश्वासनांना लोक कंटाळले आहेत.त्यामुळे मतदानलाच जायचे नाही हा ट्रेंड समाजामध्ये वाढत चालला आहे. सुजाण मतदार स्वच्छ चरित्र्याचा आणि उच्चशिक्षत उमेदवार मागू लागले आहेत.त्यामुळेच मी माळशिरस विधानसभा निवडणूक लढवनार असल्याचे शंकर बागडे यांनी अकलूज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये सांगितले.
शंकर सिताराम बागडे हे गेल्या 23 वर्षांपासून एल. आय. सी.चे काम करत जनतेच्या संपर्कात आहेत.तसेच अर्थशास्त्रात एम.ए.पदवी प्राप्त केलेली आहे.शंकर बागडे हे बागेवाडी गावचे पोलीस पाटील असून सोलापूर ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेल्या स्माईल एफ एम 90.8 चालवीत आहेत. त्यांच्या संस्कृती बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून त्यांनी रक्तदान शिबीर,वृक्षारोपण,पाणी आणि भविष्य या विषयावर अनेक मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहेत.इतर सामाजिक कामातही ते नेहमी अग्रेसर असतात.
बागडे पुढे म्हणाले,सध्याचे राजकारण खराब असल्यामुळे चांगले तरुण वर्ग राजकारण येत नाही आहेत.त्यामुळे आपल्या माळशिरस तालुक्या पुढे असलेल्या पारंपरिक समस्या कित्येक पिढ्या गेल्या तरी अद्याप सुटलेल्या नाहीत.तालुक्याचा पश्चिम भाग आजही तहानलेलाच आहे.औदयोगिक क्षेत्राचा विकास न झाल्याने सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम नाही त्यामुळे तरूण वर्ग कामासाठी शहराकडे जात आहे.या तरुणांच्या हाताला काम देणे गरजेचे आहे.
पोलीस पाटील,एल.आय. सी व एफ एम च्या माध्यमातून मी तालुका जवळून पहिला आहे. शरद पवार साहेबांच्या पक्षाकडून मी विधानसभेचे तिकीट मागणार आहे.त्यांच्याकडून तिकीट न मिळाल्यास मी अपक्ष निवडणूक लढविण्यावर मी ठाम असल्याचे शंकर बागडे यांनी पत्रकारांना सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा