*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही तकलादूचे आंदोलन म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असून या आंदोलनात नाहक कर्मचारी वर्गाची फरफट होत आहे. अनेककर्मचारी ना इलाजाने आंदोलनात सहभागी व्हावे लागल्याचे फोन अतुल खुपसे यांना करत होते .त्या मुळे कर्मचार्यांच्या या आंदोलनास त्यांनी पत्र देवून पाठींबा दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांना पाठींबा देण्यासाठी सोलापूर जिल्यातील बांधकाम कर्मचारी काळे फीत लावून अतुल खुपसे यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत असताना कुर्डूवाडी येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जावून कर्मचार्यांच्या आंदोलनालाच अतुल खुपसे यांनी पाठींबा दिला आहे.यावेळी खुपसे यांनी काळी फीत लावून पाठिबा पत्र येथील उपस्थित लिपिकास दिले आहे. या पत्रात त्यांनी त्यांचे आंदोलन अधीक्षक अभियंता संजय माळी यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात होते.त्यांच्या मूळ गावी व पुणे येथे बेहिशोबी मालमत्ता याची तक्रार लाच लुचपत विभाग कडे चालू आहे .इडी व सी.बी.आय कडे त्यांच्या तक्रारी केल्या असून त्याची चौकशी चालू आहे अनेक कर्मचारी आंदोलनात नाहक सहभाग नोंदवावा लागल्याचा फोन करून माहिती देत आहेत .त्यांचे आंदोलन कर्मचारी विरोधात नसून भ्रष्टाचारी संजय माळी यांच्या विरोधात आहे .माझा कर्मचारी वर्गास पाठींबा आहे .अधिक्षक अभियंता यांनी कर्मचार्यांना जबरदस्ती करून आंदोलनास बोलवले तर मलाही कर्मचार्याची बाजू घेवून आंदोलन करावे लागेल असे नमूद केले आहे माढा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही रस्ता चांगल्या दर्जाचा नाही, प्रत्येक रस्त्याच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता हे टक्केवारी घेऊन ठेकेदाराना काम देतात आरोप करत दि.१४ जून २०२४ रोजी त्यांच्या कार्यकर्त्यालाच अधिक्षक अभियंता प्रतिकृती बनवून आंदोलन केले होते.यावेळी अभियंत्याच्या प्रतिकृतीस काळे फासून अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले होते.सदर आंदोलना नंतर अधीक्षक अभियंता यांनी काही कर्मचारी हाताशी धरून आज आंदोलन केले आहे. खुपसे यांना सदर आंदोलनात ना इलाजाने सहभागी व्हावे लागल्याचे अनेक फोन कर्मचारी करत होते. .त्यामुळे त्यांनी थेट पत्र देवून काळी फीत लावून कर्मचार्यांना संदेश दिला आहे.
फोटो मध्ये- कुर्डूवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभातील लिपिकास काळी फीत लावून कार्यकर्त्यासह खुपसे यांनी कर्मचार्यांनच्या आंदोलनास पाठींबा पत्र दिले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा