*🌳 वटसावित्री 🌳*
आयुर्वेदी वटवृक्ष
लावू एक तरी आज
करू सार्थ व्रत खरे
धरित्रीचा सृष्टीसाज ॥ १ ॥
फांद्या तोडून आज तु
नको करू वड पूजा
निसर्गाच्या विरोधात
मनी नको भाव दूजा ॥२ ॥
प्राण रक्षण्या पतीचे
प्राणवायू अलंकार
लाभो उत्तम आरोग्य
जपू संस्कृती संस्कार ॥ ३ ॥
साल जुनाट वडाची
आहे व्याधी निवारक
वृक्ष आयुष्यवर्धक
सखा जीवनतारक ॥४ ॥
सत्यवान सावित्रीस
करू आज नमस्कार
पारंब्याच्या विस्ताराने
घडो सारा चत्मकार ॥५ ॥
राहो सदैव पवित्र
वटवृक्ष पृथ्वीवर
देऊ संदेश सकला
वृक्ष लागवड कर ॥६ ॥
चिरंजीव वटवृक्ष
देई सकलांना छाया
प्रार्थिते वटवृक्षास
सुखी ठेव माझा राया ॥७ ॥
कवयित्री
*सुवर्णा घोरपडे*
संग्रामनगर-अकलूज
ता.माळशिरस जि.सोलापूर




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा