इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी, मोबाईल 8378081147
- जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मार्गावर निरा नदीवर असणारे सराटी येथील पुलावर मोठं मोठ्याले खड्डे पडल्याने सतत अपघात होवून नागरिकांना त्रास होत आहे. इंदापूर व अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीच्या वादात खड्डे न बुझवल्यास पालखीतील वाहने व वारकऱ्यांना याचा सामना करावा लागणार आहे.
जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी इंदापूर - अकलूज पालखी मार्गाचे काम तीन वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. पालखी १० जुलैला इंदापूर मुक्कामी असून ११ जुलैला इंदापूर - अकलूज मार्गाने सकाळी मार्गस्थ होवून वडापूरी, बावडा येथील दुपारचा विसावा करून पुणे जिल्ह्यातील शेवटचा सराटी मुक्कामी येणार आहे. परंतू यामार्गाचे काम याहीवर्षी पुर्ण न झाल्याने पालखीतील वाहने व लाखो वैष्णवांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
तसेच १२ जुलैला सराटी येथील मुक्काम आटोपून पालखी सोहळा नीरा नदीतील पादुका स्नान आटोपून सोलापूर जिल्ह्यातील अकलूज कडे नीरा नदीवरील पुलावरून जाणार आहे. परंतू पुलावर कठड्या लगतहुन जवळपास १० ते १२ खड्डे पडल्याने पादचारी व वाहन चालकांना खड्डे चुकवत येडेवाकडे होत जावे लागत आहे. त्यामुळे वाहनांचे अपघात होवून नुकसान होत आहे.
इंदापूर व अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हद्दीच्या वादात खड्डे न बुझवल्याने नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच पालखी सोहळ्यातील लाखो वैष्णवांना संभाव्य अपघातापासून बचावासाठी तातडीने खड्डे बुझवून पुलाला रंगरंगोटी करून घेण्याची मागणी होत आहे. अनेकदा तर काम न करताच लाखो रूपयांचे बिल काढून खर्चले जाते. पण रस्त्याची साफ सफाई, स्वच्छता व रंगरंगोटी केली जात नाही.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांनी पालखी मार्गाच्या व सराटी येथील पुलाच्या दुरावस्थेकडे लक्ष देवून प्रश्न निकाली काढावा अशी मागणी केली जात आहे.
फोटो - सराटी येथील नीरा नदीवरील पुलावर मोठं मोठाले खड्डे पडल्याचे दिसत आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा