*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
* विठ्ठल बाग माळीनगर येथील जिल्हा परिषद शाळेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून जि. प. विठ्ठलबाग शाळेत विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली
याप्रसंगी माळीनगर ग्रामपंचायतचे सरपंच सौ अनुपमा एकतपूरे व आजी-माजी सर्व सदस्य यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात करून शाळेच्या नव्या परसबागेत विविध रोपांची लागवड करण्यात आली
या जयंतीचे औचित्य साधून
माळीनगर ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. विशाखा निंबाळकर यांचा वाढदिवस त्यांनी शाळेच्या मुलांसोबत उत्साहात साजरा केला
या वाढदिवसा निमित्त विशाखा निंबाळकर
त्यांच्याकडून मुलांना बिस्किटे चॉकलेट्स खाऊ वाटप व साहित्यासाठी देणगी देण्यात आली
या न्यादिन व जयंती निमित्त उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांचा शाळेचा वतीने त्यांचा सन्मान करुन अल्पोपहार देण्यात आला
तसेच शाळेच्या सर्व सुविधांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सरपंच आणि सदस्यांकडून देण्यात आले
या प्रसंगी अकलूज केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख आर बी जाधव ग्रामपंचायत सदस्या
विशाखा निंबाळकर ,सुजाता शिंदे, विराजसिंह निंबाळकर , अभिजीत वजाळे तसेच माजी सदस्य अंकुश फुले अनिल एकतपुरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष- दिपाली कोळी, शिक्षण प्रेमी --सीमा शिंदे, उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पारपडण्यासाठी होले सर आणि मुलाणी मॅडम यांनी परिश्रम घेतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा