Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २६ जून, २०२४

*सनातन्यांचा विरोध झुगारून समाज उध्दाराचे कठीण कार्य, शाहू महाराजांसारख्या युगपुरुषामुळेच शक्य झाले--- दिलीप चिकदुळे यांचे भावोद्गार*

 


*प्रा.विश्वनाथ पाटील*

*कोल्हापूर--पन्हाळा

कोडोली (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर ) : दिनांक : - २६: " सनातन्यांचा विरोध झुगारुन समजोद्धार करणे हे कोणत्याही सामान्य माणसाला शक्य नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे युगपुरुष असल्यामुळेच त्यांना तत्कालिन सामजिक परिस्थिती बदलणे शक्य झाले " , असे भावोद्गार येथील यशवंत विद्यामंदिरचे ज्येष्ठ शिक्षक दिलीप चिकदुळे यांनी काढले. येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते. महाविद्यालयाच्या सृजनशीलता व व्यक्तिमत्त्व विकास विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


     अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील म्हणाले, " राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा वसा पुढे चालवायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीने निःस्वार्थ कार्य करावे. कार्य करताना महाराजांना खूप त्रास झाला म्हणून त्यांनी खचून जावून कार्य करायचे सोडून दिले नाही. महाराजांच्या याच वृत्तीचा आदर्श आज प्रत्येक व्यक्तीने जोपासला पाहिजे."

   प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहूंच्या प्रतिमेचे पूजन केले.

     याप्रसंगी प्रा.एस डी रक्ताडे,प्रा.गुलनाज कमरुद्दीन मुजावर प्राध्यापक ,शिक्षकवृंद,व विद्यार्थी उपस्थित होते.

   विभागबप्रमुख प्रा. ए. के. बुरटुकणे यांनी प्रास्तविक केले. सुभाष चौगुले यांनी सूत्रसंचलन केले. अनिरुद्ध गौतम कांबळे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा