*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
डॉक्टर कदम गुरुकुल इंदापूर मध्ये समर्थ अमोल जगदाळे दहावीच्या परीक्षेत 96 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला आहे
सीबीएसई दिल्ली बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून डॉक्टर कदम गुरुकुल इंदापूर हायस्कूल चा निकाल शंभर टक्के लागला असून प्रशालेमध्ये चि .समर्थ अमोल जगदाळे हा विद्यार्थी विद्यालयात प्रथम आला आहे .द्वितीय क्रमांक हर्षित सिद तसेच तृतीय क्रमांक मयंक गांधी याचा आलेला आहे .
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कदम सर व डॉक्टर कदम मॅडम ,सचिव ,मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे .
त्याच्या यशाबद्दल आई प्रा .सौ .मिनाक्षी अमोल जगदाळे ,जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष .वडिल श्री अमोल शिवाजी जगदाळे प्रहार संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांच्यासह ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा