*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
नवी दिल्ली;- - 28 जून वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा (नीट) पेपरफुटीचा प्रकार समाेर आल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल 25 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी ज्या परीक्षेवर आपले भवितव्य ठरवतात, यातील गैरप्रकार समाेर आल्याने पालक आणि विद्यार्थी वर्गात प्रचंड राेष आहे. ही परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची आग्रही मागणी केली जात आहे. पेपरफोडणाऱ्या रॅकेटने 700 विद्यार्थ्यांकडून 200 काेटी रुपये गाेळा करण्याचे टार्गेट ठेवले हाेते, अशी माहिती सांगितली आहे.
पेपर वाहतूक करणाऱ्या कंपन्या प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या केंद्रांवर पाेहाेचवतात. तिथेच पेपरफुटीचा खेळ सुरू हाेताे. पेपर फोडण्यासाठी अनेक वेवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जाताे, असेही नीट पेपरफुटी नेटवर्कच्या सूत्रधारापैकी एक असणाऱ्या बिजेंदर गुप्ता याने सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा