Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ४ जुलै, २०२४

*सांगली येथील पत्रकार-- "इकबाल मुल्ला "यांच्या लेख युक्त पाठपुराव्याची दखल शादी खाना सभागृहासाठी शासनाकडून 3 कोटी मंजुर-- मुस्लिम समाजाच्या वतीने आभार*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

पञकार ",इक्बाल मुल्ला " यांच्या लेखाची व पाठपुराव्याची दखल ! सांगलीतील ईदगाहमध्ये "शादीखाना" - सभागृह मंजूर झाला आहे.

 शादीखाना / मंगलकार्यालयासाठी मुलीच्या आई - वडिलांना 25000 ते 1 लाख पर्यंत हॉल चे भाडे द्यावे द्यावे लागते . लग्नाचा इतर खर्च असताना हे हॉलचे भाडे म्हणजे अंगावर "शहारे" आणणारे असते. या "अवाढ्यव्य" असणाऱ्या मंगलकार्यालयाचा खर्च वाचावा म्हंणून सांगली तसेच महाराष्ट्रातील सर्व ईदगाह मध्ये गोरगरीब मुलींच्या पालकांसाठी "शादीखाना" बांधण्यात यावा व येथे मोफत विवाह व्हावा व आई वडिलांचे पैसे"वाचावेत" या उदात्त दृष्टीकोनातून शादीखाना /सभागृहष बांधण्यात यावे यासाठी पञकार इक्बार मुल्ला यांनी एक "परखड" लेख लिहिला होता .



आ त्यांच्या लेखाची प्रासंगिक व गंभीर दखल महाराष्ट्र सरकारने तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. आज त्यांनी सांगलीच्या ईदगाह च्या सभागृहासाठी तीन कोटी ( 3 कोटी ) रुपये मंजूर केले. 

"विवाह सोहळ्याच्या" या पवित्र सोहळ्यास गोरगरीब पालकांना कर्जाचा विळखा व "गळ्याला" फास बसत होता . शादीखाना असणाऱ्या मंगलकार्यालयांचे अवाढव्य भाडे पालकांना परवडत नव्हते. लग्नाचे कर्ज "फेडण्यात" अर्धे आयुष्य जात होते .

पालकांच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांची मानसिकता हृदयद्रावक होती .सांगली -मिरजेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट ) च्या सांगली -मिरजेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी - नेत्यांनी या संवेदनशील विषयांवर प्रकाशझोत टाकून "शादीखाना" चा विषय प्राधान्यक्रमाने पुढे आणला .व आज गोरगरीब पालकांच्या डोक्यावरील भार कमी केला त्याबद्दल सर्व नेत्यांचे /कार्यकर्त्यांचे अभिनंदन !



      मतभेद - मतभेद विसरून सभागृहासाठी प्रयत्न व्हावा !

सांगली जिल्ह्याच्या नावलौकिकात भर टाकणारे आलिशान ईदगाह सांगलीचा "नावलौकिक" वाढवत असताना महाराष्ट्र सरकारने याच शाही ईदगाह मध्ये सर्वसामान्य ते श्रीमंत सर्वांसाठी गरजेचा असणारा "शादीखाना" बांधण्याचे नियोजन करणे ही सांगलीकरांसाठी "अभिमानाची बाब म्हणावी लागेल. आता ईदगाह मध्ये गरीब ते श्रीमंत सर्वांचे मोफत विवाह होतील याचा मनस्वी "आनंद": होत आहे . समस्त मुस्लिमांनी गट - तट विसरून आदर्शवत "पुढाकार" घेऊन सदर शादीखाना "पूर्णत्वास" जाण्यासाठी पाठपुरावा करण्याची नितांत गरज आहे .


"आमीर कोई नहीं ..

"गरीब" कोई नहीं

"हक" बात को जो "सच्चाई" में बदल दे 

उसके जैसा "इमानवाला" कोई नही..! 


       इक्बाल मुल्ला यांच्या धारदार - परखड आणि निष्पक्ष लेखणीने सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत कित्येक समाजहिताच्या "विषयात" त्यांनी न्याय दिला आहे . वस्तुनिष्ठ निस्वार्थी समाजप्रबोधन केले आहे .माझ्या लेखाची प्रामाणिकपणे व गंभीरपणे दखल घेत आज माजी महापौर इद्रिस नायकवडी, माजी महापौर , दिग्विजय सूर्यवंशी तसेच कर्तृत्वसंपन्न - धडाकेबाज नगरसेवक जमील बागवान आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी इक्बाल भाईनी सुचवलेल्या वस्तुनिष्ठ गंभीर* विषयाची दखल घेतली त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार ! हजारो पालकांचे आशीर्वाद या सर्व नेत्यांना लागल्याशिवाय राहणार नाही, ही "काळ्या" दगडावरील पांढरी "रेष" आहे ! आज सदर शादीखाना "पूर्णत्वास" जातं आहे, त्याबद्दल मनस्वी आनंद होत आहे.


    "महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन !"


सांगली - मिरजेसाठी "50 कोटी" रुपयाचा निधी दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे विशेष अभिनंदन ! ईदगाह च्या कामाशिवाय सांगली -मिरज - कुपवाड अनेक महत्वपूर्ण कामासाठी त्यांनी विशेष निधी दिला आहे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज पुतळा सुशोभीकरण , सांगलीत ईदगाह मैदानात शादीखाना / सभागृह, "डॉ.बाबासाहेब आंबेडकर" पुतळा सुशोभीकरण, सांगलीतील पक्षीसंग्रहालय विकसित करणे , "अहिल्यादेवी होळकर" स्मारक सुशोभीकरण, सांगलीतील वाहनतळ विकसित करणे, सांगलीतील त्रिकोणी बागेतील मध्यवर्ती बसवेश्ववर मध्यवर्ती निदान केंद्र विकसित करणे अशा अनेक कामांसाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पद्माकर जगदाळे , राष्ट्रवादी अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी , त्याशिवाय शहर जिल्हा कार्याध्यक्ष नगरसेवक जमील बागवान , अतहर नायकवडी , जिल्हा नियोजन समिती सदस्य बिरेंद्र थोरात , महिला आघाडी जिल्हाध्यक्षा राधिका हारगे , विष्णू माने , युवा नेते सोहेल इनामदार, वसीम नायकवडी तसेच जयश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली . मुस्लिम समाजाला ईदगाह साठी 3 कोटी दिल्याबद्दल सांगली जिल्ह्यातील समस्त मुस्लिम समाजाकडून महाराष्ट्र सरकारचे व विशेषतः उपमुख्यमंत्री "अजित पवार" यांचे हार्दिक आभार ! 


 *इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध,

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा