उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रत्नाई कृषि महाविद्यालय मार्फत कृषि निविष्ठा विक्रेत्याकरिता कृषि विस्तार सेवा पदविका (देसी अभ्सासक्रम) राबविला जातो.या अभ्सास क्रमाच्या पाचवी बॅचची प्रथम शिवारफेरी लवंग गावात काढण्यात आली होती.
लवंग येथील प्रगतशील बागायतदार प्रशांत भिलारे यांचे केळी प्रक्षेत्रास व महादेव भोसले यांच्या नावीन्यपूर्ण सफरचंद लागवडीस पहाण्यासाठी शिवारफेरीचे आयोजीत करण्यात आली होती.सदर भेटी दरम्यान कृषि निविष्ठा विक्रिते यांना केळी व सफरचंद लागवडी संदर्भात संपूर्ण माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात आली.सदरचा पदविका अभ्यासक्रम मॅनेज हैद्राबाद, वनामती नागपूर व आत्मा सोलापूर यांचे मार्फत राबविला जातो.हा अभ्सास क्रम 48 आठवडयाचा असून आठवड्यातून एक दिवस शनिवारी घेतला जातो.या अभ्सासक्रमाचा एक भाग म्हणून ही शिवार फेरी प्रा.डी.जे.जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या भेटीस सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा