*संपादक ---हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.;--9730 867 448
तुळजाभवानी साखर कारखान्याची थकीत बिले तात्काळ देण्यात यावी यासाठी 8 जुलै रोजी तुळजापूर तहसिल कार्यालय समोर अमोल जाधव हे आमरण उपोषण करणार आहेतयाबाबत सविस्तर वृत्त असे की
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना हा गोकुळ शुगर इंडस्ट्रीज धोत्री यांना भाडेतत्त्वावर चालण्यास दिला आहे मात्र 2022 / 2023 तसेच 2023/ 2024 या गळीत हंगामात तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा, कुंभारी ,मंगरूळ ,मसला, शिराढोण, तसेच धाराशिव तालुक्यातील कनगरा ,टाकळी, सह अनेक गावातील शेतकऱ्यांनी या कारखान्यासाठी ऊस पाठवला होता मात्र शेतकऱ्यांच्या पाठवलेल्या उसाची बिले अद्याप पर्यंत दिली नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे याबाबत दिनांक 7 जून रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते तसेच दिनांक १९ जून रोजी तुळजापूर येथील जुन्या बस स्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले होते मात्र याबाबत अध्याप पर्यंत कोणताही निर्णय न झाल्याने सोमवार दिनांक 8 जुलै रोजी तुळजापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे शिवसेना उबाठा गटाचे शिवसैनिक अमोल शिवाजी जाधव यांनी सांगितले याच कारखान्याचे चार महिन्याचे कामगाराचे वेतन सुद्धा मिळाले नसल्याने कामगारांनाही देखील मोठ्या आर्थिक संकटास सामोरे जावे लागत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे याबाबत कारखान्याने कामगारांची देणे तात्काळ देण्यात यावी अशी मागणी कारखान्याचे कामगार युनियनचे उपाध्यक्ष साहेबराव भिसे यांनी केली ,यावेळी कामगार युनियनचे कोषाध्यक्ष नारायण शिंदे व शेतकरी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा