*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
तुळजापूर - येथील कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसैनिकांनी महाआरती करत साहेबांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
तुळजापूर शहरासह धाराशिव जिल्हा भरातील शिवसैनिक यावेळी तुळजाभवानी मंदिरात उपस्थित होते. पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील वरदायिनी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना मा उपजिल्हाप्रमुख श्याम पवार, शिवसेना तुळजापूर शहरप्रमुख सुधीर कदम ,शिवसेना उप तालुका प्रमुख सुनील जाधव ,शिवसेना उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे ,युवा सेना तालुकाप्रमुख प्रतिक रोचकरी ,माजी नगरसेवक राहुल खपले ,अमोल शिवाजीराव जाधव, धाराशिव नगरसेवक सोमनाथ आप्पा गुरव, पंकज भैया पाटील, रवी भैया वाघमारे, राणा बनसोडे ,माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन बप्पा शेरखाने,पांडूरंग भोसले,सुमित बागल, गणेश साळुंके, व धाराशिव शिवसेना उपशहरप्रमुख बंडू आदरकर, रवी एडके नगरसेवक ,शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले ,अर्जुन आप्पा साळुंखे, नवनाथ जगताप, प्रदीप इंगळे, अनमोल साळुंखे, इत्यादी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा