Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २७ जुलै, २०२४

*वीर धरणातून 13911क्युसेस चा विसर्ग होत आसल्यामुळे "निरा "नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.*

 


*उपसंपादक---नुरजहाँ शेख*

  *टाइम्स 45 न्युज मराठी*

वीर धरण, ता. पुरंदर जि. पुणे

  या धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला असून वीर धरणाची आज दि.27 जुलै 2024 सकाळी 10.15 वाजता पाणी पातळी 579.85 मीटर आहे आणि एकूण धरण साठा 100% झाला असून वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार वीर धरणाच्या सांडव्याद्वारे 4637 cusecs विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला तो वाढवून 13911 cusecs इतका करण्यात येत आहे.

पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल.

तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत.

कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी संबंधितांची राहील.

-

 कार्यकारी अभियंता

नीरा उजवा कालवा विभाग फलटण,जिल्हा सातारा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा