*कवियिञी-प्रा.अनिसा सिकंदर, दौंड*
*मो.9270 055 666
भारत रत्न डॉ. ए. पि जे.अब्दुल कलाम
भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम
युवा पिढीचे आहे प्रेरणास्थान
लहान वयात केली देश सेवा
देशाला दिला क्षेपणास्त्राचा ठेवा
जपून इच्छा आशा विश्वास मंत्र
अवगत केले प्रगतीचे तंत्र
रोहिनी पृथ्वी अग्नी केले निर्माण
दिले आम्हा तंत्रज्ञान बलवान
विज्ञान तंत्रज्ञानाला दिली गती
मिसाईल मॅन म्हणून ख्याती
साहित्य संशोधनात नामांकन
मायजर्नी अग्नि प्रज्वलीतमन
निर्मळ निस्वार्थी सच्चे राष्ट्रपती
संशोधनात त्यांची जगात किर्ती
प्रा.अनिसा सिकंदर'दौंड
९२७००५५६६६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा