साऊ फातिमा ज्योतिबांनी शिक्षणाची ज्योत पेटवली
त्यामुळे देशभर आज संपूर्ण स्त्री जात ही शिकली
उस्मानफातिमाने ज्योती साऊला आश्रय दिला घरी
शिकविण्या मुली सावित्री फातिमा हिंडले दारोदारी
१८४८ साली भिडे वाड्यात उघडली मुलींची पहिली शाळा
संपूर्ण स्त्री जातीला घातली दोघींनी शिक्षणाची माळा
आज प्रत्येक क्षेत्रात मुली झळकत आहेत खास
त्री ज्ञानज्योतीमुळेच झालाय आज एवढा विकास
मुलिंची शाळा भिडे वाड्याची पहावत नाही अवस्था
ज्योतीबा सावित्री फातिमाने खाल्ल्या होत्या किती या खस्ता
पहिल्या मुलींच्या शाळेवर झालाय खूपच अन्याय
स्मारक बनवून मिळेल थोडा भिडेवाड्याला न्याय
प्रत्येक कार्यात ज्योती साऊला होती फातिमाची साथ
प्रत्येक सुखदुःखात एकमकांचा हातात होता हात
शाळेत येता जाता कंटकांनी केला शेणी मातीचा मारा
साऊमाई फातिमामाईने दिला नाही कुणाला थारा
क्षणा क्षणाला साऊ फातिमा समाज कंटकाशी लढल्या
शिक्षणा विरोधी बुरसट विचारांशी दोघी भिडल्या
ज्ञान गंगोत्री म्हणून मिळावा फातिमामाईलाही मान
स्मारकात मिळावे फातिमा अन् उस्मानलाही स्थान
ज्योति साऊला फातिमा उस्मानने दिला भक्कम आधार
स्मारक बनवताना फातिमा उस्मानचा व्हावा विचार
अनिसा सिकंदर शेख
.दौंड जि. पुणे
९२७००५५६६६




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा