Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०२५

महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा!- खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नाला यश.. .न्यायालयाने केला जामीन मंजूर!! सुप्रिया सुळेंनी मानले पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आभार

 मुख्य संपादक -- हुसेन मुलाणी.                                           टाइम्स 45 न्यूज मराठी.                                                           मो:-9730867448



महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याला पंजाबमधील शस्त्र तस्करी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे 

पंजाबमधील मे. न्यायालयाने सिकंदर शेख याला जामीन मंजूर केला आहे

सिकंदर याच्यावर याआधी कोणताही गुन्हा दाखल नव्हता,

तसेच देशाचा मोठा पैलवान असल्याची बाब लक्षात घेऊन जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दोन दिवसापूर्वी पंजाबमध्ये शस्त्रास्त्रांच्या तस्करी प्रकरणात सिकंदर शेखला अटक करण्यात आली होती.

पंजाब पोलिसांनी सिकंदर शेखला केलेल्या अटकेमुळे कुस्ती वर्तुळात गोंधळ उडाला होता

पंजाबमधल्या पपला गुर्जर टोळीला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याच्या आरोपाखाली सिकंदरसह चौघांना अटक करण्यात आली होती

या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी पंजाबचे मुख्यमंत्र्यांना फोन करून सिकंदर शेख बाबत झालेली घटना चुकीची असल्याचे निदर्शनास आणून दिले त्यामुळे पैलवान सिकंदर शेख यांचा जामीन झाल्याने

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळें नी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. 

खासदार -सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. 

महाराष्ट्राचा मल्ल सिकंदर शेख

 यास जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री 

भगवंत मान 

यांच्या संपर्कात होते.

मे. न्यायालयात सिकंदर  शेख यांची बाजू वकिलांनी अतिशय सक्षमपणे मांडली. त्यामुळे 

अखेर त्याला  जामीन मंजूर झाला असून तो लवकरच महाराष्ट्रात परत येणार आहे.

या संपूर्ण प्रकरणात पंजाबच्या  मुख्यमंत्र्यांनी खुप सहकार्य केले याबद्दल त्यांचे मनापासून आभार. व्यक्त करण्यात येत आहे

तसेच सिकंदर शेख च्या वकिलांनी त्याची बाजू व्यवस्थितपणे मांडून त्याला जामीन मिळवून दिला, याबद्दल त्यांचेही खासदार सुप्रिया सुळे यांनी मनापासून आभार', व्यक्त केले

                     ॲडव्हटाईज




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा