Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २४ जुलै, २०२४

*मंगरूळ ता तुळजापूर येथील हजरत गैबी पीर उरुस निमित्त परंपरेनुसार प्रसादाचे आयोजन*

 


*विशेष-प्रतिनिधी--राजु मुलाणी*

*टाइम्स 45 न्युज मराठी


मंगरूळ ता. तुळजापूर येथील ग्रामदैवत हजरत गैबी पीर ( र.आ) यांचा उरूस गुरुवार दि. 25 जुलै 2024 रोजी संपन्न होणार असून त्यानिमित्त दि. 24 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता संदल चा कार्यक्रम होणार आहे

   या निमित्त तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आणि मंगरूळच्या पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी येत असतात जे भाविक दर्शनाला येतात त्या प्रत्येकासाठी गैबी पीर देवस्थानचे विश्वस्त मुलाणी परिवारांच्या वतीने परंपरेनुसार गहू आणि गुळापासून बनवलेली( खीर) प्रसाद म्हणून वाटप केली जाते या उरुस साठी अबाल वृद्ध युवक महिला , आणि हजारोंच्या संख्येने भाविक हजेरी लावून दर्शन घेत असतात त्या अनुषंगाने याही वर्षी मुलांणी परिवाराच्या वतीने खिरीच्या प्रसादाचे आयोजन केले असून याचा मंगरूळ आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन गैबी पीर देवस्थान आणि मुलाणी परिवार मंगरुळ च्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा