*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
*संघर्षयोध्धा मनोज जरांगे- पाटील यांच्या आमरण उपोषणाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या राज्य शासनाने त्वरीत मान्य कराव्यात असे निवेदन माढा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने कुर्डूवाडी विभागाच्या उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.हे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रविकिरण कदम यांनी स्विकारले.संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी येथे २० जुलै पासून मराठा समाजाला त्वरीत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे,सगे सोयरे कायद्याची त्वरीत अंमलबजावणी करावी, तातडीने कुणबी नोंदी शोधून त्वरीत कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे, शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी व जे कर्मचारी, अभ्यासक यात काम करतात त्यांना पगार द्यावा,मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे त्वरीत मागे घेण्यात यावेत, चालू शैक्षणिक वर्षापासून मुलींना सरसकट मोफत शिक्षण देण्यात यावे व त्यासाठी कोणत्याही अटी व शर्ती ठेवू नयेत या मागण्यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत.काल त्यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस होता. आमरण कुपोषणामुळे मनोज जरांगे-पाटील यांची तब्येत वरचेवर खालावत चालली असूनही कालपर्यंत महाराष्ट्र शासनाने त्यांच्या उपोषणाची कोणतीही दखल घेतलेली नव्हती. त्यामुळे संघर्षयोद्धा मनोज जरांगे - पाटील यांच्या आमरण उपोषणाची तातडीने दखल घेऊन त्यांच्या मागण्या त्वरीत मान्य करून तसे शासन निर्णय, अध्यादेश जारी करावेत असे सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास व संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील पाटील यांची प्रकृती बिघडल्यास होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे संजय टोणपे, सचिन जगताप, अॅड.विजयकुमार आडकर,अविनाश पाटील,विजयकुमार परबत,अॅड.अशोक पाटील, दीपक सुर्वे, सुहास टोणपे, बालाजी जगताप,सुरेश बागल, सौदागर जाधव,प्रशांत गिड्डे,शंकर उबाळे,अंकुश जाधव,क्षितिज टोणपे,सागर मराळ, प्रशांत जगताप, सुजित बागल, अर्जुन कदम, निलेश बोराटे, किरण व्यवहारे, प्रविण आडकर, बाबासाहेब चवरे, सागर गवळी प्रदीप बागल,अक्षय बागल, अक्षय कदम,दिनेश देशमुख,श्रीकांत गायकवाड, कौस्तुभ मोरे, संदीप भराटे,सोमनाथ गवळी, त्रिगुण पवार,नामदेव जाधव आदी उपस्थित होते.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा