Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २८ जुलै, २०२४

*आंबेडकर वाद्यांचा इंदापूर तालुक्याच्या आमदारांना घेराव!* *सामाजिक न्याय विभागाचा निधी आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा घोषणांनी परिसर दणाणला*

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

आज रविवार दि. २८ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ वाजता भरणेवाडी येथील विद्यमान आमदारांच्या निवासस्थानी "मी आंबेडकरवादी " सामाजिक संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा महाराष्ट्र शासनाच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार , माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना सामाजिक न्याय विभागाच्या संदर्भात निवेदन दिले.

               हे निवेदन मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नावे असुन यामध्ये महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय विभागाचा बौद्ध,मागासवर्गीय, वंचित समाजाचा निधी इतरत्र वळवलेला असुन त्यामुळे वंचित घटकांची, अनुसूचित जातींच्या नागरीकांची, दलितांची प्रगती रोखुन मागासवर्गीयांवरती दुहेरी अत्याचार केला. ही बाब चीड आणणारी आहे त्यामुळे ताबडतोब तो शासनाचा जीआर रद्द करावा अशी मागणी केली आहे.



           माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हया निवेदनाचा शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

         यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे, संघटनेच्या राजशिष्टाचार समितीचे आप्पासो कदम व मिलिंद भोसले, संघटनेचे सचिव अनिल केंगार, संघटनेचे युवक अध्यक्ष सौरभ धनवडे, सोनु मोरे,रवि जाधव,अरूण भोसले, अमित घोडके, शंतनु धनवडे, क्षितीज वनसाळे, संतोष तोरणे, अतुल घोडके, राजेश बनसोडे, प्रथमेश खरात,राज वाघमारे,आफ्रोज शेख,सौरभ सावंत,सचिन गोतसुर्य, दयानंद खरात, आबा चंदनशिवे, गोपाळ जावीर, अनिकेत वाघंबरे, सौरभ करडे, अजय फले व अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा