Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २७ जुलै, २०२४

*बिगर शेतीसाठी कर्ज वाटपात बँकेचे नुकसान झाले नसताना नुकसान झाल्याचा चुकीचा अहवाल दिल्याचा ॲड- प्रकाशराव पाटील बोरगावकर यांनी केला जोरदार व्यक्तिवाद*

 


*श्रीपूर--बी.टी.शिवशरण.


सोलापूर जिल्ह्यातील बिगर शेतीसाठी कर्ज वाटपात बँकेचं नुकसान झाले नसताना नुकसान झाल्याचा चुकीचा अहवाल दिला विभागीय सहनिबंधक यांनी दिलेले मुद्दे वगळून चौकशी केली इत्यादी मुद्द्यांवर तत्कालीन संचालक यांची चौकशी केली असा जोरदार युक्तिवाद संचालकांचे वकील अँड प्रकाशराव पाटील बोरगांवकर यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 83 अन्वये चौकशी अधिकारी यांची उलट तपासणी घेतली 88चे चौकशी अधिकारी किशोर तोषणीवाल यांचे समोर चंद्रकांत टिकुळे व बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी विलास देसाई यांनी उत्तरे दिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बेकायदेशीर कर्ज वाटप करुन नुकसान केल्याचा 83 अन्वये अहवाल प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग चंद्रकांत टिकुळे यांनी दिला होता त्यांवर बँकेचे संचालक व कर्मचारी असे एकुण 67लोकांना जबाबदार धरण्यात आले आहे 83 च्या अहवालातील मुद्द्यांवर संचालकांच्या वतीने बाजू अँड प्रकाशराव पाटील बोरगांवकर यांनी मांडताना टिकुळे यांचा उलट तपास घेतला यातील बँकेचे मयत संचालक माजी आमदार बाबूराव देशमुख माजी आमदार धनाजी साठे सुजाता अं त्रोळीकर सुनिता बागल सेवक संचालक सुभाष भोसले शिवाजी दास व स्वतः अँड प्रकाशराव पाटील बोरगांवकर यांच्या वतीने प्रकाशराव पाटील बोरगांवकर व भैरु वाघमारे यांच्या वतीने अँड धनंजय पवार यांनी उलट तपासात प्रश्नांची सरबत्ती केली मुदतीनंतर चौकशी केली अधिकाराचा दुरुपयोग करून चौकशी केली विभागीय सहनिबंधक यांनी 15फेबृवारी 2022रोजी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेले टिकुळे यांना 14फेबृवारी 2017अगोदर चे कर्ज वाटपाची चौकशी करता येत नसताना बेकायदा चौकशी केली ज्या कर्ज प्रकरणांची चौकशी केली त्या प्रकरणांचे सहकार न्यायालयाने हुकुमनामे केले होते संचालकांना नोटीस न देता एकतर्फी चौकशी केली 2014 मध्ये ज्या मुद्द्यांवर तत्कालीन जिल्हा उपनिबंधक बिभीषण लावंड यांनी चौकशी केली होती त्याच मुद्द्यांवर आपण चौकशी केली सहकारी बँकेचे पोट नियम न पहाता चौकशी केली एनपीए ची चौकशी चुकीची केली 39युनिटचा अहवाल असताना 18युनिटची खोटी चौकशी केली मतदान व कर्ज वाटपाचे अधिकार नसताना सेवक संचालक यांना चुकीने जबाबदार धरले इत्यादी अनेक मुद्द्यांवर संचालकांच्या वतीने बाजू मांडणारे वकील अँड प्रकाशराव पाटील बोरगांवकर व धनंजय पवार यांनी उलट तपास घेतला 


कर्ज देऊ नये अशी टिप्पणी नव्हती


शरद सहकारी सुत गिरणी नान्नज उत्तर सोलापूर तालुका खरेदी विक्री संघ

घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना 

निनाईदेवी सहकारी साखर कारखान्यांना कर्ज देऊ नये अशी बँकेची कार्यालयीन टिप्पणी नव्हती असे अँड प्रकाशराव पाटील बोरगांवकर यांच्या उलट तपासात 83चे चौकशी अधिकारी चंद्रकांत टिकुळे यांनी होय असे उत्तर दिले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा