Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ५ जुलै, २०२४

*मी शेवगावकर च्या अखेर यश विधानसभेत गाजला मुद्दा गृहमंत्री करणार कारवाई*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

*शेवगाव शेअर मार्केट घोटाळा गाजला विधानसभेत माननीय आमदार मोनिकाताई राजीवजी राजळे यांनी उपस्थित केला शून्य प्रहरात तारांकित प्रश्न सुमारे 1500 कोटी रुपयांचा महा घोटाळा झाल्याचे सकृत दर्शनी सभागृहात त्यांनी मांडले प्रश्नराज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गंभीर दखल* अखेर "मांजराच्या गळ्यात बांधली गेली घंटा" फसवणूक झालेल्या हजारो गुंतवणूकदारांना दिलासा आता फरार शेअर ट्रेडर्स येणार ताळ्यावर "बकरे की अम्मा कब तक खैर मनायेगी" 


*अविनाश देशमुख शेवगाव* 9960051755

शेवगाव 5 जुलै 2024 वर शुक्रवार 


 *याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या फरार असलेल्या कथित शेअर मार्केटचे बिग बुल्स आरोपींवर संबंधित प्रकरणावर E. D. / E. O. W. / M. P. I. D. द्वारे चौकशीची मागणी गेल्या एक दीड वर्षांपासून शेवगाव तालुक्यामध्ये शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणुकीचे जवळपास लहान-मोठे 200 ते 250 तथाकथित ऑफिस उघडले दरमहा 8 ते 16 % पर्यंत परताव्याची आमिष दाखवून समाजातील सर्व स्तरातील लोकांनी गुंतवणुकी केल्या.* सुरवातीला काही महिने हे सुरळीत चालले ही देखील पण गेल्या तीन ते चार महिन्यांपासून यातील बऱ्याच ऑफिस वाल्यांनी परतवा देणे थांबवले आणि थोड्याच कालावधीत ते कुटुंबासह फरार होऊ लागले. आज घडीला *शेवगाव तालुक्यामध्ये एकही शेअर मार्केट गुंतवणूक ऑफिस वाला नाही. प्रत्येक आरोपी हा लोकांचे करोडो रुपयांच्या रकमा घेऊन फरार आहेत त्यांच्याशी कोणत्याच प्रकारचा संपर्क होत नाही. अंदाजे 1500 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त अशा रकमा बुडवून हे सगळे शेअर ट्रेडिंग करणारे ट्रेडर्स फरार आहे.* एक ढोबळ अंदाज बांधला तरी हा सगळा प्रकार दोन ते तीन हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे असे प्रथम दर्शनी दिसून येते. सर्वात खेदाची गोष्ट म्हणजे की यावर पोलीस प्रशासनाने इतके दिवस पूर्णपणे दुर्लक्ष केले व आज घडीला फसवणूक झालेल्या नागरिकांना पोलिसांकडे रीतसर तक्रार अर्ज देऊन गुन्हे दाखल करा असे मार्गदर्शन केले व कायदेशीर पाठपुरावा करून एकावर गुन्हा नोंदवला ही व त्यातील एक आरोपी आज गजाआड आहे. *परंतु घटनेचे गांभीर्य बघता तालुक्यामध्ये पाच ते दहा हजार कुटुंब या फसवणुकीला बळी पडली असून नवीन तक्रार अर्ज आज घडीला शेवगाव पोलीस स्टेशन स्वीकारत सुद्धा नाही* शेकडो अर्ज प्राप्त असूनही इतर कोणत्याही आरोपींवर गुन्हा दाखल केला जात नाही. फसवणूक झालेल्या नागरिकांची फक्त ससे होलपट होतीये. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह शेवगाव तालुक्यामध्ये निर्माण झाला आहे.

या प्रकरणात आपण जातीने लक्ष घालावे व *या घोटाळ्याची Enforcement Directorate (ED) शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करून पळून गेलेल्या आरोपींवर व सबंध प्रकरणावर E. D. / E. O. W. / M. P. I. D. या कायद्या अंतर्गत कायदेशीर कारवाई होऊन कोट्यावधी रुपयांचे रोखीत हवाला व्यवहार दोन नंबरचा पैसा राजकारणी लोकांची वर कमाई व्यापाऱ्यांनी आयकर चुकून गुंतवलेला पैसा सगळेच बिंग बाहेर येईल फसवणूक झालेल्या हजारो गुंतवणूकदारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा*



*अविनाश देशमुख शेवगांव*

*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा