Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ७ जुलै, २०२४

कोणतीही शास्त्रीय पदवी नसताना संशोधन करून काळ्या मातीमधून सोने पिकवणारा जगातील सर्वात हिंमतवान धाडसी योद्धा शेतकरी असल्याचे गौरवोद्‌गार गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी काढले.

 


इंदापूर तालुका..... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल 8378081147

: कोणतीही शास्त्रीय पदवी नसताना संशोधन करणारा, असंख्य संकटांवर मात करून काळ्या मातीमधून सोने पिकवणारा जगातील सर्वात हिंमतवान धाडसी योद्धा शेतकरी असल्याचे गौरवोद्‌गार गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी काढले.

    इंदापूर पंचायत समिती, तालुका कृषी विभाग यांच्यावतीने कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या हस्ते पंचायत समितीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रगतशील शेतकरी राजेंद्र गिरमे, पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी अमर फडतरे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर, कृषी विस्तार अधिकारी अजित घोगरे, युनूस शेख, टी. आर. गवारी यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 



    यावेळी बोलताना गटविकास अधिकारी खुडे म्हणाले की, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती करावी. महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण मिळवणारे वरकुटे बुद्रुक येथील शेतकरी विजयसिंह बालगुडे यांच्यासह कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे, सेंद्रिय खतांचा वापर करून शेती करणारे संतोष कुदळे (पिटकेश्वर), आनंद कोरंटक (नृसिंहपूर), पांडुरंग बरे (कचरेवाडी), जगन्नाथ भोंग (इंदापूर), राजेंद्र गिरमे (बावडा), श्रीरंग देवडे (निरनिमगाव), अविराज निंबाळकर (शेटफळ हवेली) यांचा यावेळी शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

    कृषी विस्तार अधिकारी युनूस शेख यांनी प्रास्ताविक केले. पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी अमर फडतरे यांनी सूत्रसंचालन केले. तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर यांनी आभार मानले. मंडल कृषी अधिकारी योगेश फडतरे, मंडल कृषी अधिकारी सूर्यवंशी, पिसाळ, ग्रामसेवक, शेतकरी, कृषी सहायक कार्यक्रमास उपस्थित होते.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा