Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ७ जुलै, २०२४

*तरुण पिढीने स्व." प्रतापसिंह मोहिते पाटील "यांचा आदर्श घ्यावा --ह.भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर*

 


*अकलुज -----प्रतिनिधी*

*केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी.

आजच्या तरुण पिढीने संपूर्ण जीवन जनसेवेसाठी समर्पीत केलेले लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहीते-पाटील यांचा आदर्श घेतला पाहिजे असे आवाहन राष्ट्रीय किर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले. 



           लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहीते-पाटील यांचे पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या किर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते ते पुढे म्हणाले की,तरुणांनी पाश्‍चात्य संस्कृती स्वीकारताना भारतीय संस्कृतीचे जतन करणे आवश्यक आहे,भारतीय संस्कृती, महाराष्ट्राची संत परंपरा महान असून संत ज्ञानेश्‍वरी व संत तुकाराम महाराज यांच्या गाथा माणसाच्या जीवनात प्रेरणादायी ग्रंथ आहे,प्रत्येकांनी ज्ञानेश्‍वरीची एक तरी ओवी अभ्यासुन चिंतन केले तर आयुष्य सुखी समाधानी होईल असे विचार समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले.



            यावेळी लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहीते-पाटील यांचे स्मरणार्थ डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या वतीने, निवृत्ती महाराज देशमुख यांनी अनाथ मुलांसाठी चालवत असलेल्या ओझर बुद्रुक (ता.संगमनेर) येथील ज्ञानेश्वर माउली सेवाभावी संस्थेच्या विद्यार्थ्यांना २००० वह्याचे वाटप निहानसिंह मोहिते पाटील यांचे हस्ते देण्यात आले. 



           या कार्यक्रमास पद्मजादेवी मोहिते-पाटील, उर्वशीराजे मोहिते-पाटील, ईलाक्षीराजे मोहिते- पाटील, निहानसिंह मोहिते-पाटील यांचेसह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा