इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
--- महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी सुनील शिंदे, कार्याध्यक्षपदी विजय पाटील तर कोषाध्यक्षपदी दत्तात्रेय लकडे यांच्यासह कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यकारिणी मध्ये सरचिटणीस पदी विनय मखरे, तालुका उपाध्यक्षपदी लतीब तांबोळी, तालुका संपर्कप्रमुख पदी देवानंद जमदाडे, प्रवक्तेपदी संतोष हेगडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
सदर निवडीसाठी निरीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर सर व पुणे जिल्हा शिक्षक समितीचे सरचिटणीस संदीप जगताप सर यांनी काम पाहिले. यावेळी मावळत्या कार्यकारिणीचा सन्मान करून नवीन कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला. शिक्षक हितासाठी शिक्षक समिती सदैव प्रयत्न करीत राहील असे अध्यक्ष पदावर निवड प्रसंगी सुनील शिंदे बोलत होते.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष सुरेश पवार सर त्यांची कार्यकारणी, पुणे जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील वाघ सर, महादेवराव माळवदकर, सुनिल लोणकर, कुंजीर सर, माजी अध्यक्ष ज्ञानदेव बागल तसेच इंदापूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त श्रावण बाळ अनाथ आश्रम इंदापूर येथील गरजू मुलांना दैनंदिन उपयोगी साहित्याचे वाटप शिक्षक समितीच्या सर्व शिक्षकांच्या मदतीतून करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय लोहार सर यांनी तर आभार भारत ननवरे सर यांनी केले.
फोटो - महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या इंदापूर तालुका कार्यकारणीची निवड झाली.
---------------------------





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा