*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
पर्यावरण रक्षणाचा संदेश देत शंकर नगर येथील महर्षी प्रशाले ने सामाजिक बांधिलकी जपत 75000 बीज गोल व वृक्ष लागवडीतून संदेश दिला आहे
। निसर्गाचा ठेवा मान,
पर्यावरणाचा करा सन्मान
तेव्हाच थांबेल जागतिक
तापमान वाढीचे थैमान।।
याचीच जाणीव ठेवून व भविष्यातील पर्यावरणीय धोके टाळण्याचा हेतू समोर ठेऊन,
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील व मदनसिंह शंकराव मोहिते पाटील यांचे अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त प्रशालेतील विद्यार्थ्यां मार्फत 75 हजार बीज गोलनिर्मिती संकल्प साकारण्यात आला.
सासे हो रही है कम,
आओ पेड लगाये हम।
सामाजिक बांधिलकीशी नाळ जोडून समाजाशी असलेलं आपलं नातं प्रगल्भ करण्याच्या दृष्टीने व वाढते वैश्विक तापमान वाढ कमी करण्याच्या उद्देशाने प्रशालाचे सभापती नितीनराव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची निर्मिती झाली.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र चौगुले कार्यकारी संचालक सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना शंकरनगर ,आबासाहेब रुपनवर कृषी अधिकारी माळशिरस, धर्मेंद्र सावंत वनरक्षक, सतीश कचरे वनरक्षक लाभले होते. सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी आपल्या ७५ हजार बीजगोळे प्रकल्पाचे निकड व गरज याबाबत सांगितले.
सर्व प्रमुख मान्यवरांचा सन्मान समारंभ संकुलाच्या वतीने पार पडला. विद्यार्थी मनोगत आत रूद्रा घाडगे, कीर्ती साठे या विद्यार्थ्यांनी आपल्या तडफदार भाषाशैलीत आक्का साहेबांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. संकुलातील सहशिक्षिका प्रतिभा राजगुरू यांनी रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या चंदन रुपी जीवनाचा परिचय आपल्या भाषणातून सांगितला. प्रशालेतील कला, क्रीडा व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले.
प्रमुख अतिथी सतीश कचरे यांनी आपल्या मनोगतातून बीजगोल निर्मिती संबंधी उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रमुख अतिथी राजेंद्र चौगुले कार्यकारी संचालक सहकारी साखर कारखाना शंकरनगर यांनी आपल्या मनोगतातून ग्लोबल वॉर्मिंगची कारणे, परिणाम व उपाय यांवर उहापोह केला.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते 75 हजार बीजगोल निर्मिती प्रकल्प शुभारंभ व आठ फूट उंचीच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
सदर कार्यक्रमास गिरीश मुळे कृषी मंडल अधिकारी ,संजय लडकत,विजय काळे वनपाल नारायण बनकर , कल्याणी पांढरे ,प्रशाला समिती सदस्य कैलास चौधरी, अनिल जाधव विनोद जाधव ,नितीन इंगवले देशमुख, पत्रकार कृष्णा लावंड , शिवाजी पालवे ,मुख्याध्यापक शिवाजी पारसे ,अनिल पिसे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी व नाझिया मुल्ला यांनी केले तर आभार शिवाजी पारसे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा