*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
सुरत चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गाला धाराशिव शहर स्पर जोडणे जोडावे अशी मागणी धाराशिव चे "खासदार- ओमराजे निंबाळकर "यांनी केंद्रीय मंत्री 'नितीन गडकरी 'यांना निवेदनाद्वारे केली असून त्याबाबत सविस्तर माहिती अशी की सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडोर हा माझ्या मतदारसंघाच्या धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातून जाणार असून हा सहा पदरी राष्ट्रीय राज्यमार्ग आहे
हा राष्ट्रीय राज्य मार्ग धाराशिव शहरापासून 32 किलोमीटर दुर वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या हद्दीत प्रस्तावित आहे धाराशिव शहर वैराग पासून जिल्हा मुख्यालय आहे या राष्ट्रीय राज्य मार्गाला धाराशिव शहर स्पर जोड अंदाजे लागत 1365.84 करोड प्रस्तावित आहे धाराशिवच्या रेल्वे स्टेशन आणि विमानतळाला जोडण्यासाठी स्पर जोडला जात आहे तो धाराशिव शहर सुरत चेन्नई च्या ग्रीनफिल्ड मार्गाला सरळ जोडला जाईल तरी आपणास विनंती आहे की सुरतची चेन्नई राष्ट्रीय राजमार्ग च्या ग्रीनफिल्डला धाराशिव शहर प्रस्तावाला स्वीकृत देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित करावे अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा