*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रात सह इतर राज्यातील वारकरी सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी व दर्शनासाठी येत असतात. यामध्ये अनेक वारकरी पायी चालत येतात. अशा जाणाऱ्या व वारी वरून परत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी जनशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष औदुंबर सावंत यांच्याकडून सालाबाद प्रमाणे यंदाही फराळ वाटप कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन जनशक्तीचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी केले.
यावेळी बोलताना अतुल खूपसे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सहित गोरगरीब जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या सावळ्या विठ्ठलाच्या वारकऱ्यांची सेवा जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून करण्याचं भाग्य लाभलं हीच आमची विठ्ठल सेवा आहे. यंदा मान्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतीतील कामे उरकून शेतकरी श्री पांडुरंगाच्या भेटीसाठी ओढीने निघाला होता. जनशक्तीचे कार्यकर्ते औदुंबर सावंत यांच्या माध्यमातून सुरू केलेला फराळ वाटपाचा कार्यक्रम अत्यंत स्तुत आहे. आषाढी वारी दिवशी जाणाऱ्या भाविकांसाठी आणि दुसऱ्या दिवशी येणाऱ्या भाविकांसाठी अशी सोय करून शेतकरी रुपी खऱ्या विठ्ठल वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य आमच्या संघटनेला लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी एक टन शाबू खिचडी वाटप व केळी वाटप करण्यात आले.
यावेळी अभिमान गायकवाड, बिभीषण शिरसट, औदुंबर सावंत, संदीप राऊत, हनुमंत लाड, शंकर सावंत, मनोहर गुजले, प्रकाश सावंत, भाऊसाहेब लोहार, मोहम्मद मोगल, मनसूब काझी, अब्दुल शेख, दिलीप लोंढे, निसार काझी, नानासाहेब पाटील, रणजीत राऊत, सोमनाथ सावंत, दीपक लोभे, अरविंद अवचर, लखन लाड, अरमान काझी, कमाल काझी, आलिशान पठाण, संतोष लोहार, प्रेम लोहार, राजकिरण ओहोळ, जहांगीर काझी यांच्या सह जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा