*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
मंगरूळ तालुका कळंब येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया( शाखा क्रमांक 09281) नवीन प्रस्तावित खाजगी जागेत स्थलांतर करीत आहे. याचा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तसेच मंगरूळ येथील ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध व स्थलांतरास हरकत घेण्यात आली आहे. यासंदर्भात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, व जिल्हा उपाध्यक्ष रितापुरे यांच्या नेतृत्वाखाली संबंधितांना निवेदन देण्यात आले आहे . याच्या पूर्वी मंगरूळ ग्रामस्थांच्या वतीने व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांनी लेखी व तोंडी स्वरूपात ग्रामपंचायत मंगरूळ, बँक मॅनेजर व वरिष्ठांकडे वेळोवेळी निवेदन व हरकती नोंदवले असताना सुद्धा जाणून बुजून ग्रामपंचायतीच्या जागेतून खाजगी व्यक्तीच्या जागेत स्थलांतर करत आहे.
खाजगी व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी गोर गरिब व नागरिक यांच्या ग्रामपंचायतीला वेठीस धरून व खाजगी लोकासोबत संगणमत करून गाव पुढारी आर्थिक लाभाच्या दृष्टीने गावाच्या विकासाला छेद देण्याचा डावपेच व गाव विरोधी धोरण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच गावातील इतर नागरी सुख सुविधा संदर्भात प्रथमता खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी सर्व मंगरूळवासी यांना पाठिंबा देऊन बँकेच्या स्थलांतरास विरोध दर्शवण्यासाठी सक्षमपणे ग्रामस्थांच्या पाठीशी उभे रहावे अशो विनंती ग्रामस्थांनी केली आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा