*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
लोणारी समाज हा महाराष्ट्रातील विस्थापित समाज आहे. या समाजाचा पारंपरिक व्यवसाय बंद पडल्याने या समाजाला ऊसतोड कामगार, शेत मजुर, खाजगी वाहन चालक अशी पडेल ती कामं करुन आपली उपजीविका करावी लागते. या व्यवसायाने कुटुंब कसेबसे चालते. परंतु कुटुंबाच्या शिक्षणणिक, वैद्यकीय गरजा भागत नसल्याने या समाजात प्रचंड असाक्षरता व मागासलेपणा आहे. या समाजाच्या उत्थानासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन स्व. विष्णुपंत दादरे लोणारी आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेची मागणी लोणारी समाजाकडून होत आहे. सदर मागणीसाठी त्रेपन्न आमदार महोदयांनी आपली सहमती पत्रं देवुन या समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. गत उन्हाळी अधिवेशनातही काही सदस्यांनी सरकारकडे मागणी केली आहे. परंतु यावर अजुन सरकारकडून कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे लोणारी समाजात प्रचंड उद्रेकाची भावना आहे. त्यामुळे चालु पावसाळी अधिवेशनात या महामंडळाची घोषणा करावी या मागणीसाठी येत्या मंगळवारी म्हणजे ९ जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण लोणारी समाज बांधवांकडुन करण्यात येत आहे. या उपोषणास लोणारी समाजास लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा असे आव्हान लोणारी समाजाचे युवा नेते सागर दादा गोडसे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा