*अकलुज-----प्रतिनिधी*
*केदार ---लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूज येथील शिवरत्न शिक्षण संस्था अंतर्गत असणाऱ्या शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज,शिवरत्न सीबीएसइ स्कूल येथील विद्यार्थी प्रतिनिधींचा पदग्रहण समारंभ,दीक्षांत सोहळा, व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर व संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते.नूतन खासदार व शिवरत्न संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांनीही सर्व विद्यार्थी प्रतिनिधी व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यात प्रथमता शालेय विद्यार्थी प्रतिनिधी व चार गटाचे गटप्रमुख,विषयवार गटप्रमुख यांचा पदग्रहण व शपथविधी पार पडला.त्यानंतर संस्थेतील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासमवेत सत्कार व गुणगौरव करण्यात आला. तसेच पूर्वप्राथमिक,प्राथमिक,माध्यमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील पहिली पदविका मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे नारायण शिरगावकर म्हणाले की,विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल करावी,त्यासाठी प्रयत्न व कष्ट करण्याची तयारी ठेवावी. विद्यार्थ्यांच्या शिस्तप्रियतेचे भरभरून कौतुक केले.संस्थेच्या अध्यक्षा सौ.शितलदेवी मोहिते पाटील यांनी विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास संस्थेतील मान्यवर डॉ.विश्वनाथ आव्हाड, श्रीकांत राऊत,अशरफ शेख, अल्बर्ट थरकन,सौ.बिनो पाउलस, एस एम पी स्कूल व सीबीएसई स्कूलचे समन्वयक तसेच मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.जुलेखा मुकेबिल,कु.प्रणाली खुळे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा